सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळेंची आठवण सांगत पंचहात्तरीबाबत एक विधान केलं. “पंचाहत्तरीची शाल अंगावर आली की निवृत्त व्हायचं असतं” असं मोहन भागवत यांनी पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं. मोरोपंत पिंगळे यांना निवृत्त होण्यास सांगण्यात आलं तेव्हा ते निवृत्त झाले असंही मोहन भागवत म्हणाले. मोहन भागवत यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. दरम्यान याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

सरसंघाचालकांच्या वक्तव्यावर संजय राऊत काय म्हणाले?

मी या संदर्भात एक रोखठोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते. त्यावेळी काय चर्चा झाली त्याचा सारांशही मी लिहिला होता. ७५ वर्षे हे भाजपातलं निवृत्तीचं वय आहे. नरेंद्र मोदींनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांना निवृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी लादली. आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे, त्यांच्या डोक्यावरचे केसही उडाले आहेत. जगभ्रमण करुन झालं आहे. सगळी सुखं भोगून गेलं आहे. आता जो नियम तुम्हीच केला आहे ७५ वर्षे वयाचा. मला वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सूचित करतं आहे की तुम्हाला निवृत्त व्हावं लागेल. त्यांना देश सुरक्षित हातांमध्ये सोपवावा लागेल. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच अमित शाह यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत असतील तर देशासाठी हे शुभसंकेत आहेत असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

मोदींना निवृत्त व्हायचं आहे हे मोहन भागवत त्यांना विसरु देणार नाहीत-राऊत

७५ वर्षे निवृत्तीचा नियम आहे तो सगळ्यांसाठी समान आहे. लालकृष्ण आडवाणी असोत, नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शाह.त्यांना आता निवृत्त व्हावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी वचनं देतात ती विसरतात. १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचं वचन, गरीबी हटवण्याचं वचन, पाकिस्तानला धडा शिकवण्याचं वचन हे सगळं मोदी विसरले आहेत. मात्र तुम्हाला निवृत्त व्हायचं आहे ही बाब देश मोदींना विसरु देणार नाही तसंच सरसंघचालक मोहन भागवतही विसरु देणार नाहीत.

मुंबई वाचवायची असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र लढलं पाहिजे ही लोकभावना-राऊत

मुंबई वाचवायची असेल, मराठी माणसाला वाचवायचं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत ही लोकभावना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका

कोण दीपक केसरकर? दहा पक्ष फिरुन आलेल्या माणसाला उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं. तुम्ही जरा स्वतःला प्रश्न विचारा मग आम्हाला विचारा. दीपक केसरकर हा बेईमान माणूस आहे. सावंतवाडीच्या आसपास एक मोती तलाव आहे. त्या तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात. त्यातला मोती तलावावरचा हा कावळा आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान