शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील झालेल्या हल्ल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान या प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांचं नाव आलं असल्याने त्यांच्यावर अटकेची टांगली तलवार आहे. नितेश राणे यांनी याप्रकरणी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्जदेखील केला असून त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान या प्रकरणावरुन शिवसेना आक्रमक झाली असून कडक कारवाईची मागणी करत आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंवर टीका केली आहे.

“मतदारांवर दबाव आणण्यासाठी १८ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने नितेश राणेंचं नाव घेतलं होतं. पोलीस तपासात नितेश राणे दोषी आढळल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

नितेश राणे यांना अटक होणार? आज कोर्टात सुनावणी, दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज; नारायण राणे दौरा सोडून कणकवलीत

“नारायण राणे यांनी पोलिसांना केंद्रात माझं सरकार असल्याचं आव्हान दिल आहे. नितेश राणेदेखील बाबा मला वाचव या पद्धतीने पडद्याआड लपून बसले आहेत. सरकारने आणि पोलिसांनी योग्य कारवाई केली पाहिजे अशी मागणी आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषी असल्यास कारवाई करावी. नारायण राणेंप्रमाणे नितेश राणेंनाही अटक होईल असा आम्हाला विश्वास आहे,” असं यावेळी ते म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नारायण राणे जेव्हा स्वत: वाघ म्हणून वागत असतात, लोकांवर आरोप करत असतात. पण आपल्यावर आरोप झाले की पडद्याच्या आड लपतात हे कालच्या भूमिकेवरुन स्पष्ट झालं आहे. नितेश राणे यांनी कितीही आव्हानं करु देत, पण आज ते लपून बसले आहेत. त्यांनी पोलिसांसमोर येऊन भूमिका मांडली पाहिजे. नारायण राणे, नितेश राणे चुकीच्या पद्धतीने वागत आहेत, त्यामुळे शिक्षा होणार आहे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं.