पंढरपूर : मकरसंक्रांतीला येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. मात्र करोना आणि राज्य सरकारने त्या अनुषंगाने जे नियम लागू केले त्याचे पालन काटेकोरपणे केले जाणार आहे. तसेच मकरसंक्रांतीला वाणवसा करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने वाढत्या करोना वाढीमुळे इतर र्निबध लागू केले असले तरी मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे मकरसंक्रांतीला भाविकांना दर्शन घेता येणार आहे. मात्र राज्य सरकारने मंदिरात हार, फुले, नारळ आदी साहित्य नेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा मंदिरात महिलांना संक्रांतीनिमित्त वाणवसा करता येणार नाही असा निर्णय बैठकीत झाल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

याचबरोबर मंदिरात दान दिलेले सोने, चांदी हे वितळवण्याबाबत सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याला अधीन राहून आणि समिती मधील सदस्यांची एक समिती स्थापून सोने, चांदी वितळवले जाणार आहे. यामध्ये देवाचे जुने, पुरातन सोने चांदीचा वापर केला जाणर नाही असे त्यांनी सांगितले. तसेच कृती आराखडा, उड्डाण पूल उभारणे या विषयावर देखील बैठकीत चर्चा झाली.  दरम्यान, मकरसंक्रांतीला जरी दर्शन खुले राहणार असले तरी दिवसा जमावबंदीचा आदेश लागू आहे. तसेच  दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी करोना नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र, मुखपट्टी, योग्य अंतर व इतर नियमाचे पालन करावे लागेल असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.