अहिल्यानगर: श्रीरामपूर शहराची गरज लक्षात घेऊन महायुती सरकारने १७८ कोटी रुपयांच्या निधीतून वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली. या योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करा, अशी सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरपालिकेला केली.

श्रीरामपूरमधील विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज, शनिवारी झाला. यावेळी त्यांनी वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. मंत्री विखे म्हणाले, महायुती सरकारने सन २०५१ ची लोकसंख्या गृहीत धरून २६.३६ दक्षलक्ष लिटर पाणी प्रति दिन लागण्याचा आराखडा तयार केला.

जल शुध्दीकरण केंद्राचे फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले, दगडी सोलिंग व क्राँकीटचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितली. नवीन उंच जलकुंभाचे काम जुने बांधकाम पाडल्यानंतर हाती घेण्यात येणार असून, वितरण व्यवस्थेसाठी ५९ किमी. पैकी १७ किमी. जलवाहिनीचे काम पूर्ण आहे.

योजनेच्या तलावाचे सर्वेक्षण पूर्ण करून बोअर कोअर चाचणी झाली. तलावाचे खोलीकरण निर्धारित वेळेत पूर्ण करून आरसीसी काम करण्यात येणार आहे. नंतर तळातील मातीचा थर प्लास्टिक शीट वाळूचा थर आदी काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योजनेच्या कामात त्रृटी राहणार नाही याकडे लक्ष देण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, माजी नगराध्यक्ष संजय फंड, दीपक पठारे, केतन खोरे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शरद नवले, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील आदी उपस्थित होते.