अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातातील मृतांमध्ये दोन विद्यार्थींनींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर कंटेनरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला कट मारुन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षास जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षामधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकलवरील तिघे, असे ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, सर्व जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोपरगाव परीसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

