राज्य गुप्तवार्ता विभागातील सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

साहाय्यक पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरण

अलिबाग  : सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी राज्य गुप्त वार्ता विभागातील सहा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अतिरिक्त उप्पर आयुक्त नम्रता अलकनुरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत लांगी, सहाय्यक आयुक्त इनामदार यांच्यासह आर. व्ही. शिंदे, विजय बनसोडे आणि रवींद्र साळवी या तीन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.  यांनी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात आत्महत्या केली होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक कणेरकर यांनी  १६ ऑगस्ट रोजी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात वरील सहा अधिकाऱ्यांची नावे होती. कणेरकर हे यापूर्वी राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत होते. २०१८ मध्ये त्यांचे सह अधिकारी प्रशांत लांगी यांचे पाकीट कार्यालयातून चोरीला गेले होते. हे पाकीट चोरल्याचा आरोप कणेरकर यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणावरून या सर्व अधिकाऱ्यांनी कणेरकर यांची वारंवार बदनामी केली होती. यामुळे कणेरकर यांच्यावर मानसिक दडपण आले होते.

दरम्यानच्या काळात प्रशांत कणेरकर यांची राज्य गुप्त वार्ता नियंत्रण कक्षातून रायगड पोलीस दलात बदली झाली. मात्र नैराश्यातून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Six officers booked for abetment of raigad policeman suicide zws

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या