सोलापूर : सोलापूरच्या नाट्य, कला, संस्कृतीसाठी प्रमुख आधार केंद्र असलेल्या हुतात्मा स्मृतिमंदिराची झालेली दुरावस्था थांबविण्यासाठी शासनाने सुमारे तीन कोटी ३५ लाख रूपयांचा निधी देण्याचे जाहीर करून वर्ष उलटत आहे. परंतु नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध झाला नसताना या नाट्यगृहात दीड कोटी रूपये खर्च करून ध्वनियंत्रणा कार्यान्वित झाली खरी; परंतु ही नवीन ध्वनियंत्रणाही सदोष असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

हेही वाचा >>> चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गुरूवारी सोलापूर महापालिकेने सकाळी तज्ज्ञांकडून हुतात्मा स्मृतिमंदिरातील ध्वनियंत्रणेची चाचणी करून घेतली. या चाचणीचा निष्कर्ष पुढे आला नाही. ध्वनियंत्रणा प्रामुख्याने नाट्यप्रयोगांच्या सादरीकरणाच्या दृष्टीने पूरक नाही. त्यात अनेक दोष आहेत. ध्वनियंत्रणेत अधुनमधून खरखर होतो. शेवटच्या टोकापर्यंत ध्वनियंत्रणेचा आवाज चांगल्या प्रकारे पोहोचत नाही, अशा तक्रारी स्थानिक नाट्य कलावंतांसह नाट्य व्यवस्थापन क्षेत्रातील मंडळींनी केल्या होत्या. अ. भा. मराठी नाट्य परिषद सोलापूर उपनगरीय शाखेनेही याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती.