सोलापूर : सोलापूर महापालिकेने कर वसुलीसाठी चालू आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा हाती घेतलेल्या अभय योजनेचा लाभ घेत ३४ दिवसांत नागरिकांनी एकूण ६८ कोटी ३५ लाख ७४ हजार १५८ रूपयांचा महसूल कर रूपाने महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. शेवटच्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी रविवारी, दिवसभरात सात कोटी ६३ लाख ३६ हजार ५२८ रुपये कर भरणा झाला. चालू वर्षात सुट्टीसह एकूण १०८ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. १०० कोटी करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल मध्यरात्री नववर्ष आरंभी मध्यरात्री पालिका कर्मचाऱ्यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा : “तुपकर स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवत असतील तर चांगलंच आहे, पण…”, राजू शेट्टीचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी यापूर्वी गेल्या जुलै महिन्यात थकीत कर वसुलीसाठी अभय योजना राबविली होती. त्यावेळी मिळकतदारांनी चांगला प्रतिसाद देताना मिळकत करासह अन्य कर वसुलीला प्रोत्साहन मिळण्यासाठी अभय योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यावेळी थकीत कर भरताना ऑनलाईन प्रणालीत काही दिवस तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे इच्छा असूनही थकीतकर भरण्यास मिळकतदारांना अडचणी आल्या होत्या. परंतु, अभय योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी आयुक्त शीतल उगले यांनी धुडकावून लावली होती. परिणामी, नंतर थकीत करवसुली परिणामकारक न होता संथ झाली होती. थकीत करवसुलीसाठी झालेली कारवाईही तोकडी ठरली होती. तेव्हा अखेर २८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत पुन्हा अभय योजना राबविणे प्रशासनाला भाग पडले. या योजने अंतर्गत शास्ती, नोटीस शुल्क व वॉरंट शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत देण्यात आली.