सोलापूर : पोलीस खात्यात नोकरी मिळविण्यापासून ते खात्यात सेवा बजावताना २९ वर्षांच्या सेवाकाळात राजकीय दबावाने झालेल्या १६ बदल्या, सेवापुस्तिकेत आकसबुध्दीने मारलेले शेरे, त्याविरोधात केलेली प्रशासकीय आणि न्यायालयीन स्तरावरील लढाई, प्रशासनाची अनास्था आणि गळचेपीमुळे हुकलेली बढती, सातत्याने दुय्यम स्तरावर झालेल्या नेमणुका, असा संघर्ष करीत असताना दुसरीकडे निराश न होता प्रत्येकवेळी मिळालेल्या संधीचे सोने करीत कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल हे उद्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत.  पोलीस खात्यात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना बहुतांशी अधिकाऱ्यांना सत्ताधारी राजकीय नेते आणि प्रशासनातील वरिष्ठांच्या भ्रष्ट युतीमुळे त्रास सहन करावा लागतो. स्वाभिमान बाजूला ठेवून व्यवस्थेशी जुळवून न घेणाऱ्या अशा अधिकाऱ्यांकडे वक्रदृष्टीनेच पाहिले जाते. प्रगत महाराष्ट्रात अरिवद इनामदार यांच्यासारखे अधिकारी त्याचे ठळक उदाहरण ठरतात. त्यात हरीश बैजल यांचीही भर पडल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरीश मगनलाल बैजल हे १९९० साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपअधीक्षकपदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. इथपासून त्यांना सतत अन्यायाविरुद्ध लढा द्यावा लागला. राजकीय पुढाऱ्यांचा रोष ओढवून घेतल्याने झालेल्या बदल्या हे त्यांच्या दीर्घकाळातील बदल्यांचे वैशिष्टय़. नुसत्या बदल्या करून त्यांच्यावरील राग व्यवस्थेने व्यक्त केला नाही, तर त्यांना योग्यवेळी मिळू शकणाऱ्या बढतीच्या वेळीही मोडता घालत, ती मिळू नये, यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. बैजल यांचे वेगळेपण असे, की राजकारण्यांपुढे नाक न घासता, यंत्रणेला शरण न जाता, प्रत्येकवेळी योग्य त्या न्यायपीठाकडे दाद मागितली. त्या प्रत्येकवेळी त्यांना न्याय मिळाला खरा, परंतु त्यामुळे खूप काळ जावा लागला. न्याय मिळाला आणि त्यामुळे झालेल्या बदल्या अन्यायकारक असल्याचे सिद्धही झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur police commissioner harish baijal is retiring on may 31 zws
First published on: 31-05-2022 at 00:15 IST