भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल पंढरपूर तालुक्यातील प्रचारसभेवेळी बेताल वक्तत्व करणाऱ्या विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांच्याविरोधात शिवसेनेच्यावतीने सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत येथील चार हुतात्मा परिसरात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी परिचारक यांच्या प्रतिमेस चप्पलचा हार घालत जोडे मारो आंदोलन केले. या आंदोलनात माजी सैनिकांचाही सहभाग होता.
भाजपच्या प्रचारसभेसाठी परिचारक हे पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील सभेत बोलताना भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाची क्लीप सोशल मिडियावर वेगाने पसरली. त्यामुळे सोशल मिडियावरही परिचारक यांच्यावर टीका करण्यात आली. यामुळे परिचारक यांनी जाहीर माफी मागून दिलगिरी व्यक्त केली होती.
हे वक्तव्य अनावधानाने झाले आहे. सैनिकांबद्दल मला विशेष आदर आहे. सैनिक आपल्या प्राणाची बाजी लाऊन देशाचे रक्षण करतात. त्यांचा अपमान माझ्याकडून होणे शक्य नाही. गेली ४० वर्षे राजकारणात आमच्या परिवाराकडून चुकीची कृती झालेली नाही. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे परिचारक यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur zp election 2017 mla prashant paricharak abuse matter fir file against him sakal maratha military persons wife
First published on: 19-02-2017 at 16:08 IST