१७ ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या विधानसभेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे. मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर उभं राहून सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली आहे. “गद्दार सरकारचा धिक्कार असो… ईडी सरकार हाय हाय… ५० खोके… एकदम ओके” “गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…” अशा घोषणा दिल्या आहेत.

सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घोषणाबाजीनंतर बंडखोर आमदार उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे. घोषणाबाजी करणाऱ्या गटात उभे असलेले काही आमदार लवकरच शिंदे गटात सामील होतील, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- Video: ‘५० खोके…’नंतर आता ”गद्दारांना भाजपाची…’, गुवाहाटीचा उल्लेख करत घोषणाबाजी; आदित्य ठाकरे, अजित पवारांनीही दिल्या घोषणा

संबंधित घोषणाबाजीबाबत प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, “तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात पुन्हा बघितलं तर लक्षात येईल की, किती लोकं नाराज आहेत? किंवा किती लोकं नाईलाजानं तिथे बसले आहेत? काही लोकं तर घोषणाही देत नाहीत. मी सांगितल्यानंतर आता ते उद्यापासून घोषणा देतील… पण काही लोकं घोषणाही देत नाहीत, हे तथ्य आहे. त्यातील काही आमदारांनी विकासावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये तिन्ही पक्षातील लोकं आहेत. भविष्यात तुम्हालाही कळेल की, जे लोकं घोषणा देत नव्हते किंवा नाईलाजानं तिथे बसले होते, त्यातील काही आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. तो दणकादेखील आपल्याला भविष्यात दिलेला दिसेल” असं विधान उदय सामंत यांनी केलं आहे.

हेही वाचा- “तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आजही विरोधकांनी वेगळ्या घोषणा करत शिंदे गटावर निशाणा साधला. आज त्यांनी‘ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…’, ‘ईडी सरकार हाय हाय..’, ‘फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…’, ‘नही चलेगी… नही चलेगी, दादागिरी नही चलेगी…’, ‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है…’, ‘फिफ्टी- फिफ्टी… चलो गुवाहटी…’, ‘गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…’ अशा घोषणा दिल्या आहेत.