चहा विकून सीए करणारा सोमनाथ गिराम शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका’ योजनेचा ‘ब्रँड अँम्बेसिडर’ झाला खरा पण एका अपघातामुळे आज त्याची परिस्थिती दयनीय झाली असून, सरकारकडून पुरेशी आर्थिक मदत न मिळाल्यामुळे सोमनाथची गेल्या काही महिन्यांपासून परवड सुरू आहे. सरकारने आपल्याला मदत करावी, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केलीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरची परिस्थिती बिकट असल्याने सोममाथने पुण्यात चहाचे दुकान चालू केले होते. त्यानंतर काम करत शिक्षण पूर्ण करुन जानेवारी २०१७ मध्ये सोमनाथ सी.ए. झाला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सरकराने त्याला १८ एप्रिल २०१६ ला ‘कमवा आणि शिका’ या योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले होते. सोमनाथ त्याचा भाऊ श्रीकांत गिराम व गणेश गिराम यांच्यासोबत अकलूज-टेंभर्णी रस्त्यावरून जात असताना ८ सप्टेंबर रोजी त्यांची गाडी पलटी होऊन त्यांना अपघात झाला. त्यामध्ये गिराम यांच्या मज्जारज्जूवर परिणाम झाल्यामुळे कमरेपासून खालची बाजू निकामी झाली. सोमनाथ सध्या घरी झोपून असतो. त्याच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शेतकरी असलेले त्याचे वडील बळीराम गिराम बघतात. या अपघातानंतर सोमनाथला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, २४ डिसेंबरला दवाखान्यातून सोडल्यानंतर त्याला सरकारकडून ठोसपणे कोणतीही मदत मिळालेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Somnath giram solapur ca brand ambassador of kamva aani shika maharashtra government
First published on: 03-02-2017 at 09:49 IST