काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा नियोजीत महाराष्ट्रतील प्रचार दैरा रद्द करण्यात आला आहे. सोनिया गांधी रविवारी नंदूरबार, धुळे आणि मुंबई येथील प्रचार सभा घेणार होत्या . पण त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र मुंबई येथील प्रचार सभेसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
सोनिया गांधी आज सायंकाळी मुंबईतील सभेला संबोधित करणार होत्या. त्यानंतर प्रथम धुळे आणि नंदूरबार येथे प्रचारसभा घेणाऱ होत्या. सोनियांऐवजी आता राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, ते सभा घेणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशात राहुल यांच्या सभा होणार आहेत. त्यानंतर त्यांची मुंबईत सायंकाळी सभा होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार उपस्थित असणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2014 रोजी प्रकाशित
सोनिया गांधी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा नियोजीत महाराष्ट्रतील प्रचार दैरा रद्द करण्यात आला आहे.

First published on: 20-04-2014 at 12:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi cancels maharashtra tour citing health reasons