रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ११ लाख १९ हजार ९०६ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तक्रारिनुसार तत्कालीन प्रभाग संघ व्यवस्थापक दोन महिलांना रत्नागिरी शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपहार प्रकरणी पोलिसांकडून मुग्धा शैलेश शेट्ये व संगीता रामदास मोरे (दोन्ही रा. शिरगाव) या दोघींना अटक करण्यात आहे. या दोघींनी अपहार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

क्रांती महिला प्रभाग संघ शिरगाव व आरंभ ग्राम संघ उन्नती ग्राम संघ शिरगावच्या बैठक अहवाल नोंदवहीत व जमाखर्च नोंदवहीत मुग्धा शेट्ये व संगीता मोरे यांनी खाडाखोड करून त्यावर लेखन व व्हाईट शाईचा वापर केल्याचे समोर आले होते. याविषयी अंतिम चौकशी जिल्हा अभियान सहसंचालक, जिल्हा अभियान व्यवस्थापक आणि सहाय्यक लेखाधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे केली. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला होता. तत्कालीन प्रभाग संघ व्यवस्थापक मुग्धा शेट्ये व तत्कालीन प्रभाग संघ अध्यक्ष संगीता मोरे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेकडून शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. एकूण ११ लाख १९ हजार ९०६ रुपयांचा अपहार मागील पाच वर्षात केल्याचे उघडकीस आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरी शहर पोलिसांकडून या प्रकरणी मुग्धा शेट्ये व संगीता मोरे यांच्यावर भादंविक ४२०, ४६७,४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आले. या दोघींनी १८ जुलै २०१८ ते २ एप्रिल २ रोजीच्या दरम्यान क्रांती महिला प्रभाग संघ शिरगाव येथे ११ लाख हजार ९०६ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषद प्रशासनाने केल्यावर या दोघींवर कारवाई करण्यात आली आहे. याविषयी पोलीस अधिक तपास करीत आहेत.