शहरातील अमरप्रीत हॉटेलजवळील चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याचा, तसेच संग्रामनगर उड्डाणपुलास शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी घेण्यात आला.
सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली वाहिल्यानंतर शहरातील जालना रस्त्यावरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.