‘उंदिर, वाघ, साधू आणि विसरलेले छत्रपती शिवाजीमहाराज. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सिल्लोडच्या जाहीर सभेत बोधपर कथा सांगितली. कथा निष्क र्ष शिवसेनेला बोचणारा होता. एका उंदराला मांजराची भीती वाटत होती, म्हणून साधूने त्यावर अमृत शिंपडले, उंदराचे मांजर केले. मांजराच्या मागे कुत्रा लागला. पुन्हा मांजर साधूकडे गेली. साधूने तिला कुत्रा बनविले. कुत्र्याच्या मागे वाघ लागला. कुत्रा साधूकडे गेला, त्याने त्याला वाघ बनविले. वाघ बनल्यावर त्याने साधूलाच खायचे ठरविले. तेव्हा साधूने ठरविले, पुन्हा अमृत शिंपडायचे आणि वाघाचा उंदिर करायचा..’
ही कथा जाहीर सभेत सांगण्यास उभे राहिलेले अमित शहा सभास्थळी असणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराज्यांच्या पुतळ्याला हार घालण्यास मात्र विसरले. त्यांचे भाषण होईपर्यंत कार्यकर्ते हातात हार घेऊन ताटकळत उभे राहिले आणि भाषण झाल्यावर अमित शहांनी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. बोधपर कथा आणि विसरलेल्या पुष्पहाराची गोष्ट सिल्लोडमध्ये सभेनंतर चर्चेचा विषय झाला होता. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार भ्रष्ट आहे. त्याला संपविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. सिल्लोडचे भाजपचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शहा यांनी १० मिनिटे भाषण केले. या मतदारसंघातून काँग्रेसचे अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर अशी लढत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2014 रोजी प्रकाशित
बोध कथा आणि विसरलेला पुष्पहार!
‘उंदिर, वाघ, साधू आणि विसरलेले छत्रपती शिवाजीमहाराज. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सिल्लोडच्या जाहीर सभेत बोधपर कथा सांगितली.

First published on: 09-10-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of amit shah