कर्जत : कल्पक विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टी अस्तित्वात आणल्याने संशोधक यशस्वी होतो. मात्र संशोधन हे लोकांच्या उपयोगी आले पाहिजे. मनातील नवनवीन कल्पनांचे रूपांतर व्यवसायात करा, असे आवाहन उद्योजक भाऊसाहेब जंजिरे यांनी केले. कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘आयडियाचा आविष्कार’ संशोधन स्पर्धेच्या बक्षीस समारंभात ते बोलत होते.

विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘आयडियाचा आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. कर्जतमधील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. प्रकल्पाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

आयडियाच्या आविष्कार स्पर्धेमध्ये एकूण १९२ संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पाला सुमारे ४ हजार विद्यार्थी व शिक्षकांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये पोस्टर्स व उपकरणांच्या माध्यमातून संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे डॉ. जयकुमार चव्हाण यांनी संकल्पनांचे परीक्षण केले.

अध्यक्ष पदावरून बोलताना प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले, कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा, शालेय-महाविद्यालयीन वयोगटात संशोधन वृत्ती जोपासली पाहिजे. अनेकांकडे नवनवीन कल्पना असतात मात्र त्या प्रत्यक्षात साकार होत नाहीत. त्या वापरात येणे गरजेचे आहे.

स्पर्धेत तेजस्विनी घालमे, प्रतीक्षा राऊत, संन्यूजा समिंदर, सानिका घाडगे, वैष्णवी कदम, अनुजा कसरे, यश खेतमाळस, प्रणाली तावरे, संस्कृती तोरडमल, सिद्धी लाळगे, मनाली काळे, प्रांजल कापरे, रेश्मा मोढळे, प्रणव काळे, ओंकार कांबळे, प्रियांका खामगळ, प्रतीक्षा खामगळ, धनंजय रानमाळ, प्रज्ञा सरवदे, श्रावणी मांडगे, घालमे तेजस्विनी, तेजस गुंड, अण्णा ढवळे, वैष्णवी राऊत, वैष्णवी साबळे, मारुती जाधव, प्रतीक्षा गायकवाड, कल्पना म्हस्के, सृष्टी जायभाय, उज्वला काळे, योगिता भोंडवे, सानिका धवन, वैष्णवी नेवसे, सिद्धी निंबाळकर, तुषार जाधव, साक्षी काळे, सानिया शेख, वैष्णवी गायकवाड, अनिरुद्ध मोढळे, माउली फरतडे, नम्रता कानगुडे, पूजा बळे, संस्कृती बनकर, अक्षता, काजल जगताप, सार्थक वडावकर, श्रेया कानगुडे, तृष्णा सुरवसे या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी अनिल तोडमल, सुभाषचंद्र तनपुरे, कैलास काळे, प्रकाश धांडे, राजकुमार चौरे, सुनील गोरखे, प्रकाश उडाने आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे संयोजन डॉ. महेश भदाणे, प्रा. नितीन दुपडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. महेश भदाणे, सूत्रसंचालन प्रा. राम काळे प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले.