ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि साखर कामगारांचे नेते साथी किशोर पवार (वय ८६) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. साथी किशोर पवार यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून किशोर पवार आजारीच होते. अस्वस्थ वाटू लागल्याने महिन्यापूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि प्रकृती खालावल्याने बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य, मोहन धारिया, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. नीलम गोऱ्हे, मोहन जोशी आदी सामाजिक आणि कामगार चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2013 रोजी प्रकाशित
साखर कामगार नेते किशोर पवार यांचे निधन
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि साखर कामगारांचे नेते साथी किशोर पवार (वय ८६) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. साथी किशोर पवार यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
First published on: 03-01-2013 at 04:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suger workers leader kishor pawar passed away