सांगली : व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वत:ला श्रद्धांजली वाहत प्रेमभंगातून तरुणाची आत्महत्या

आत्महत्येपुर्वी या तरूणाने भ्रमणध्वनीवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर विरह गीताची ध्वनी चित्रफित प्रसारित केली होती.

suicide
( संग्रहित छायचित्र )

प्रेमभंग झालेल्या एका तरूण शेतमजुराने भ्रमणध्वनीवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वत:चाच फोटो टाकून भावपूर्ण श्रध्दांजली वाहत आत्महत्या करण्याचा प्रकार वाळवा तालुक्यातील नागठाणेमध्ये घडला. आत्महत्येपुर्वी या तरूणाने भ्रमणध्वनीवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर विरह गीताची ध्वनी चित्रफित प्रसारित केली होती.

वाळवा खेड रस्त्यावरील एका गोठ्यामध्ये शेतमजुरीचे काम करणारा सुशांत भरत तोडके (वय २६) याने गोठ्यामध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांने भ्रमणध्वनीवर विरह गीत प्रसारित केले. त्यानंतर अर्ध्या तासाने स्वत:चा फोटो टाकून भावपूर्ण श्रध्दांजलीचा संदेश प्रसारित केला. तो ईशान गावडे यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्यास होता. सुशांतचा भावपूर्ण श्रध्दांजलीचा संदेश पाहताच त्याच्या पालकांनी घरमालक गावडे यांना चौकशी करण्याची विनंती केली. गावडे यांनी शोधले असता गोठ्यात त्यांने आत्महत्या केल्याचे समोर आले.

सुशांतने भ्रमणध्वनीवर प्रसारित केलेले विरहगीत असे होते…

इतने अनमोल तो नही, लेकिन हमारी कदर याद रखना
शायद हमारे बाद, कोई हम जैसा ना मिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suicide of a young man in a love affair while paying homage to himself on whatsapp status amy

Next Story
विश्लेषण: दारूच्या दुकानात सर्वच मद्य मिळतात तरी त्याला ‘वाईन शॉप’ का म्हणतात?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी