ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमातील दुरुस्तीविरोधात मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे गणेश विसर्जनावेळी होणारा दणदणाट तूर्ततरी कायम राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमात शांतता क्षेत्राबाबत केंद्र सरकारने दुरूस्ती केली होती. शांतता क्षेत्र अधिसूचित करण्याचे सर्वस्वी अधिकार राज्य सरकारांना बहाल करण्यात आले होते. ही दुरूस्ती १० ऑगस्टपासून अंमलातही आली होती. शैक्षणिक संस्था, रूग्णालय, न्यायालय, धार्मिक स्थळांच्या सभोवतालचा १०० मीटर परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून मानला जात होता. नव्या दुरुस्तीनुसार सरकार जाहीर करेपर्यंत एखादा परिसर शांतता क्षेत्र मानला जाणार नव्हता. या दुरुस्तीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या पूर्णपीठाने या वादग्रस्त दुरूस्तीला स्थगिती दिली होती. यामुळे मुंबईतील १,५३७ शांतता क्षेत्रे कायम राहणार होती. गणेश विसर्जन आणि नवरात्रोत्सवादरम्यानच्या उत्सवी दणदणाटाला आळा बसणार होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court stays bombay highcourt order noise pollution ganpati visarjan central government policy silence zone
First published on: 04-09-2017 at 18:01 IST