मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडें या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आज सोलापूर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महागाई आणि पीएफआयवरील बंदीवरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. दरम्यान, यावेळी पत्रकारांनी त्यांना पंकजा मुंडेंच्या भाजपा सोडण्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा. जर कोणी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार असेल, तर त्यांचे स्वागतच आहे.”

हेही वाचा – Supriya Sule vs Shinde : “सुप्रिया सुळेंची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना…”; शिंदे गटाचं प्रत्युत्तर

दरम्यान, केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदी नंतर अनेकांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशी मागणी होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule statement on pankaja munde ncp joining spb
First published on: 30-09-2022 at 16:31 IST