राज्याचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांचे मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. येथील नवजीवन सोसायटीचे ते अध्यक्ष होते.

कर्तव्यनिष्ठ, निर्भीड आणि पारदर्शी पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. गेल्या वर्षीच त्यांना अरविंद इनामदार फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पोलीस जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. चार महिन्यांपूर्वीच ते अमरावतीहून मुंबईत वास्तव्यासाठी गेले होते. त्यांच्या निधनाची वार्ता अमरावतीत पोहोचल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये शोककळा पसरली.