गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्या नावाने बनावट व्हॉटसॲप खाते उघल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सय्यद एजाज (वय ४२) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. सय्यदने सावंत यांच्या नावाने बनावट व्हॉटसॲप खाते उघडले आणि काही राजकीय व्यक्तींसोबत नागरीकांना मेसेज केला होता.

सायबर गुन्हे विभागाकडून शोध

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सायबर गुन्हे विभागाने अत्याधुनिक तपास यंत्रणेच्या सहाय्याने मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तपासाअंती औरंगाबादमध्ये राहणाऱ्या सय्यद एजाज नामक व्यक्तीने हा उद्योग केल्याचे समोर आले. एवढंच नाही तर सय्यदने सावंत यांच्या नावे बनावट व्हॉटसॲप खाते उघडल्यानंतर काही राजकीय व्यक्तींना आणि नागरीकांना मेसेजही केला होता.

मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर प्रकार उघडकीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेसेज मिळाल्यानंतर काही व्यक्तींनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सय्यदला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. सय्यदवर माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.