सांगली : भाजप आणि सुरेशभाऊ खाडे युवा मंचच्या वतीने आयोजित केलेली दहीहंडी सलग तिसऱ्या वर्षी तासगावच्या शिवाजी युवक गोंविदा पथकाने फोडून विजेतेपद पटकावले व हॅटट्रिक केली. सात थरांची रचना करत तासगावच्या तरुणांनी सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाचा मान पटकाविला. आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे व सुशांत खाडे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे १ लाख ५५ हजार ५५५ रुपये रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
मिरज हायस्कूल मैदानावर दहीहंडीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेत्री सोनाली पाटील व नयन जयप्रकाश यांच्यासह महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक उपस्थित होते. महिलांसाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली होती. महिला गोविंदा पथकाने सलामी दिली. यानंतर भैरवनाथ गोविंदा पथक सातारा, शिवाजी तरुण गोविंदा पथक तासगाव, दत्त अंब्रेश्वर गोविंदा पथक, कुरुंदवाड या गोविंदा पथकांना संधी देण्यात आली. यामध्ये तासगावच्या गोविंदा पथकाने सात थर लावून दहीहंडी फोडून प्रथम क्रमांकाचा तिसऱ्यांदा मान मिळविला.
सलग तिसऱ्या वर्षी तासगावच्या शिवाजी युवक गोंविदा पथकाने फोडून हे विजेतेपद पटकावले व हॅटट्रिक केली. सात थरांची रचना करत तासगावच्या तरुणांनी सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाचा मान पटकाविला. आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे व सुशांत खाडे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे १ लाख ५५ हजार ५५५ रुपये रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, मकरंद देशपांडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, सुरेश आवटी, काकासाहेब धामणे, निरंजन आवटी, संदीप आवटी, माजी महापौर संगीता खोत, अजिंक्य हंबर, जयगोंड कोरे उपस्थित होते. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत मै हू डॉन म्हणत आ. खाडे यांनी ठेका धरल्यानंतर कार्यकर्ते व गोविंदा पथकाने ठेका धरला. पावसाची हजेरी असतानाही दहीहंडी पाहण्यासाठी मिरजकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.