MLC Election Result : गेल्या काही दिवसांपासून शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली होती. नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. यासह अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

stone pelting amol kirtikar
अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेत दगडफेक, दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Palghar loksabha Constituency review Hitendra Thakurs party benefits to BJP or Thackeray group
मतदारसंघाचा आढावा : पालघर- हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचा फायदा भाजप की ठाकरे गटाला?
catchy slogans lok sabha election 2024, slogans in lok sabha election 2024
‘खासदार मंदिरवाला की दारुवाला हवा’, ‘रामकृष्ण हरी वाजवा….’; विरोधकांवर टीकेसाठी प्रचारात आकर्षक घोषवाक्ये
Mahadev Jankar
“भावी मंत्री म्हणून बोलतोय, निवडणुकीच्या निकालानंतर मी…”, महादेव जानकरांचं बारामतीकरांसमोर वक्तव्य
latur lok sabha election 2024 marathi news
अमित देशमुख यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी , भाजपसाठी गड राखण्याचे आव्हान
Navneet Rana
“मला असं वाटतंय की अमरावतीची जनता या सूनेच्या…”, नवनीत राणांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाल्या, “संस्कृतीनुसार…”
Maratha reservation protest Manoj Jarange Patil Antarwali Sarathi politics
मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ऐन निवडणुकीत शुकशुकाट; मनोज जरांगे दौऱ्यावर
nanded lok sabha marathi news, nanded lok sabha latest marathi news
मतदारसंघाचा आढावा : नांदेड; निवडणूक चिखलीकरांची आणि नेतृत्व कसोटी अशोक चव्हाण यांची!
Live Updates

Teachers-Graduate MLC Election Live Update: शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?

22:52 (IST) 2 Feb 2023
सत्यजित तांबे यांच्याकडे विजयी आघाडी; कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरील मतमोजणी प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्याकडे विजयी आघाडी आहे. अधिकृत निकालाची घोषणा होण्याअगोदरच कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे.

21:40 (IST) 2 Feb 2023
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीअखेरची आकडेवारी -

वैध मते - 75622

अवैध मते - 8378

--

सत्यजित सुधीर तांबे : 45607

शुभांगी भास्कर पाटील : 24927

रतन कचरु बनसोडे : 1713

सुरेश भिमराव पवार : 719

अनिल शांताराम तेजा : 70

अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 154

अविनाश महादू माळी : 1076

इरफान मो इसहाक : 46

ईश्वर उखा पाटील : 145

बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 466

ॲड. जुबेर नासिर शेख : 191

ॲड.सुभाष राजाराम जंगले : 185

नितीन नारायण सरोदे : 171

पोपट सिताराम बनकर : 37

सुभाष निवृत्ती चिंधे : 117

संजय एकनाथ माळी : 123

एकूण : 84000

19:41 (IST) 2 Feb 2023
नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक दुसरी फेरी अपडेट

एकूण मतदान - 1 लाख 29 हजार 456

सत्यजित सुधीर तांबे : 31009

सत्यजित सुधीर तांबे : 31009

शुभांगी भास्कर पाटील : 16316

रतन कचरु बनसोडे : 1157

सुरेश भिमराव पवार : 360

अनिल शांताराम तेजा : 46

अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 100

अविनाश महादू माळी : 623

इरफान मो इसहाक : 28

ईश्वर उखा पाटील : 89

बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295

ॲड. जुबेर नासिर शेख : 103

ॲड.सुभाष राजाराम जंगले : 104

नितीन नारायण सरोदे : 129

पोपट सिताराम बनकर : 37

सुभाष निवृत्ती चिंधे : 83

संजय एकनाथ माळी : 76

18:57 (IST) 2 Feb 2023
“नागपूरमध्ये भाजपाचा उमदेवार असता तर आम्ही जिंकलो असतो” चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान!

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पाठिंबा दर्शवलेल्या ना.गो.गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:41 (IST) 2 Feb 2023
MLC Election Result : गाणार यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंचे धक्कादायक विधान म्हणाले, “गाणार हे भाजपचे…”

गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता. संपूर्ण भाजपची यंत्रणा गाणारांच्या प्रचाराला लागलेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मतदानाच्या दिवशीही ठिकठिकाणी गाणारांसाठी भाजपने बुथ लावले होते.

सविस्तर वाचा

18:03 (IST) 2 Feb 2023
MLC Election Result: "सत्यजीत तांबेच निवडून येणार आहेत", अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास!

सत्यजीत तांबेच नाशिकमधून निवडून येणार आहेत, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

17:53 (IST) 2 Feb 2023
MLC Election Result : मोठी बातमी, नागपुरात भाजपाला धक्का; मविआचे अडबाले सात हजार मतांनी विजयी

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजनीला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला.

सविस्तर वाचा

17:47 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नाशिकमध्ये सत्यजीत तांबे दुसऱ्या फेरीत आघाडीवर

नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांना १५७८४ मतं तर शुभांगी पाटील यांना ७ हजार ८६२ मतं मिळाली. त्यामुळे सत्यजीत तांबे ७ हजार ९२२ मतांनी आघाडीवर आहेत.

17:43 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: मतदारांनी काँग्रेसचा राग आमच्यावर काढला असेल तर... - बावनकुळे

पराभवाचं चिंतन करावंच लागेल. गेली १२ वर्षं नागपूरची जागा आमच्याकडे होती. पण आत्ता आमचा पराभव झाला. पराभवाचं विश्लेषण नक्कीच होईल. उणीवांवर काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू. जुनी पेन्शन योजना हा प्रश्न काँग्रेसनं जन्माला घातला होता. त्याचा राग आमच्यावर काढला असेल, तर हे दुर्दैवाचं आहे. याचा राग काँग्रेसवर काढला जायला हवा - चंद्रशेखर बावनकुळे

17:34 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: औरंगाबादमध्ये मविआचे विक्रम काळे आघाडीवर

औरंगाबादमध्ये मविआचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर, भाजपाचे किरण पाटील पिछाडीवर

17:28 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: अजित पवारांच्या काँग्रेसला कानपिचक्या; म्हणाले, "सत्यजीत तांबेंना जर..."

माझ्यासारख्या माणसानं काँग्रेससारख्या पक्षाबद्दल बोलणं योग्य नाही, पण सत्यजित तांबेंना जर काँग्रेसनं उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं. त्यामुळे नंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांचं आख्खं घराणं काँग्रेसच्या विचारांचं आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील - अजित पवार

17:05 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: बच्चू कडूंची निकालांवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

निकाल अजून पूर्ण हाती यायचा आहे. पूर्ण निकाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीवरून वारं बदलतंय वगैरे असं काही नाही. प्रत्येक निवडणुकीत लोकांची मतं, उमेदवार आणि त्याचे परिणा वेगळे असतात - बच्चू कडू, प्रहार संघटनेचे आमदार

17:05 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: बच्चू कडूंची निकालांवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

निकाल अजून पूर्ण हाती यायचा आहे. पूर्ण निकाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीवरून वारं बदलतंय वगैरे असं काही नाही. प्रत्येक निवडणुकीत लोकांची मतं, उमेदवार आणि त्याचे परिणा वेगळे असतात - बच्चू कडू, प्रहार संघटनेचे आमदार

16:41 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: सत्यजीत तांबेंना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार का? नाना पटोले म्हणतात...

सत्यजीत तांबे निवडून आले तर त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडायचे की नाही, यावर हायकमांड निर्णय घेईल - नाना पटोले

16:40 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: "दुसऱ्याच्या घरात आग लावताना...", नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात!

नागपूर, अमरावतीत आपण पाहाताय भाजपाची काय गत झाली. तिथे तर त्यांचे विद्यमान आमदार आहेत. दुसऱ्याच्या घरात आग लावत असताना त्यांच्या घरात जनतेनं त्यांना जागा दाखवली. जनता त्याला उत्तर देतीये. नाशिकबद्दल आमची आजही आधीचीच भूमिका होती. त्यांच्या व्यक्तिगत कौटुंबिक वादात पक्षाचं कोणतंही धोरण चुकलं नाही. पक्षाला बदनाम करण्याचं काम कुणी करत असेल, तर ठीक आहे. आमची त्यांच्यावरच्या निर्णयाची तयारी पूर्ण आहे - नाना पटोले

16:31 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नागपुरातील विजयानंतर विनायक राऊतांचं भाजपा, शिंदे गटावर टीकास्र!

देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामानंतरही सुदाकर आडबाले निवडून आले आहेत. त्यामुळे मिंधे सरकारपेक्षा मविआवर मतदार करत असलेल्या प्रेमाचं प्रतिक निवडणुकीतून दिसत आहे - विनायक राऊत

16:29 (IST) 2 Feb 2023
MLC Election Result : मोठी बातमी, नागपुरात भाजपला धक्का; मविआचे अडबाले सात हजार मतांनी विजयी

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला.

सविस्तर वाचा

16:12 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नागपुरात २२ उमेदवारांच डिपॉझिट जप्त होणार?

नागपुरात फक्त ३ उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यासाठी आवश्यक ३ हजार ४०८ मतं मिळवता आली आहेत. त्यात मविआचे सुधाकर आडबाले आणि भाजपाचे नागो गाणार यांचा समावेश आहे. त्यामुळे उरलेल्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.

16:00 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: "दया कुछ तो गडबड है", अमोल मिटकरींचं खोचक ट्वीट

देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली? "दया कुछ तो गडबड है"

https://twitter.com/amolmitkari22/status/1621091099287883778

15:51 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: भाजपाला जुन्या पेन्शन योजनेचा फटका बसला - सुधाकर आडबाले

शिक्षकांच्या अनेक समस्या १२ वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेनं दोन वर्षांपूर्वी मला उमेदवार म्हणून जाहीर केलं. मविआनं मला पुरस्कृत केलं. ३४ संघटनांचा मला पाठिंबा मिळाला. हा एकजुटीचा विजय झाला आहे. भाजपाला जुन्या पेन्शन योजनेचा फटका बसलाय. - सुधाकर आडबाले, मविआचे उमेदवार

15:44 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नागपुरात मविआची मुसंडी; सुधाकर आडबाले विजयाच्या उंबरठ्यावर!

नागपुरात मविआच्या सुधाकर आडबाले यांना १४ हजाराहून जास्त मतं मिळाल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्याउलट भाजपाचे नागो गाणार यांना ६ हजार मतं मिळाली आहेत. त्यामुळे आडबाले यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

15:35 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नाशिकमध्ये पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात

नाशिकमध्ये पहिल्या फेरीच्या मोजणीला सुरुवात झाली असून सत्यजीत तांबे आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे.

15:24 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ!

नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांचे प्रतिनिधी एका मतमोजणी केंद्रावर एका टेबलवर जास्त झाल्यामुळे गोंधळ, पोलिसांनी केली मध्यस्थी...

15:23 (IST) 2 Feb 2023
अमरावती पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपचे रणजीत पाटील पिछाडीवर

अमरावती पदवीधर मतदारसंघात एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. भाजपाचे नेते, विद्यमान आमदार, माजी मंत्री रणजीत पाटील हे अजूनही पिछाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. काही वेळाने दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु होईल. तेव्हा अंतिम चित्र स्पष्ट होईल.

15:22 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: भाजपा कुठेच राहणार नाही - वडेट्टीवार

आम्हाला आधीपासून विश्वास होता की सुधारकर आडबाले विजयी होती. एक सक्षम उमेदवार मविआनं दिला होता. पदवीधरमध्ये भाजपा नाही, शिक्षकांमध्ये भाजपा नाही, विधानसभेतही भाजपा नसणार आणि पुढे लोकसभेतही भाजपा नसेल - विजय वडेट्टीवार

15:18 (IST) 2 Feb 2023
अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक : आघाडीचे धीरज लिंगाडे यांना विजयाची खात्री, म्हणाले...

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या आज, गुरुवारी सुरू असलेल्या मतमोजणीसाठी आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे संतनगरी शेगावमार्गे अमरावतीत दाखल झाले. त्यापूर्वी शेगावात प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना त्यांनी आपणास विजयाची खात्री असल्याचे आत्मविश्वासपूर्वक सांगितले.

सविस्तर वाचा

15:17 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: "इथे धनशक्ती आणि वारसा जिंकणार नाही"

इथे धनशक्ती आणि वारसा जिंकणार नाही. संघर्ष आणि जनता इथे जिंकेल - शुभांगी पाटील

15:16 (IST) 2 Feb 2023
MLC Election Result Today 2023 : नागपूर ‘शिक्षक’मध्ये निकालाचा प्राथमिक कल मविआच्या बाजूने

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता अजनीच्या समुदाय भवन येथे सुरुवात झाली. २१ टेबलवर मोजणी सुरू आहे. तेथे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक मोजणीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले आघाडीवर असल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा

15:16 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: मतदारांनी कुणाला मत दिलंय हे मला माहिती आहे - शुभांगी पाटील

कोट्यापेक्षा जास्त मतदारांना मी ओळखते. त्यांनी मतदान कुणाला केलंय हे मला माहिती आहे. आता हे सगळं मॅनेज होऊ शकत नाही - शुभांगी पाटील

15:16 (IST) 2 Feb 2023
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाचे नागो गाणार पिछाडीवर

नागपूर शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि भाजपाचे नेते नागो गाणार हे पिछाडीवर असून सुधाकर अडबाले हे ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

15:15 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: "नाशिकमध्ये वेगळंच काहीतरी व्हायला लागलंय का?" शुभांगी पाटील यांचा सवाल!

महाविकास आघाडीनं काम केलं नसतं तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. सत्यजीत तांबेंनी सांगितलं म्हणून ते आमदार होतील असं नाही. पण बॅनरबाजीवर कायद्यानं बघितलं पाहिजे. कारवाई व्हायला हवी होती. आचारसंहितेचा भंग करणं कितपत योग्य आहे हे बघायला हवं. नाशिक विभागात काहीतरी वेगळंच व्हायला लागलंय का? असा प्रश्न मला पडलाय - शुभांगी पाटील

15:13 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: शुभांगी पाटील त्र्यंबकला दर्शनासाठी दाखल!

त्र्यंबकचं दर्शन घेतलं. बाबांना सगळं सांगितलं. जनतेला विजयी कर, असं साकडं घातलं आहे. बाबांचं दर्शन घेणं हे माझं कर्तव्य आहे - शुभांगी पाटील

14:35 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे विक्रम काळे आघाडीवर

औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे विक्रम काळे आघाडीवर आहेत. विक्रम काळे यांना आत्तापर्यंत १९ हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. नागपूरपाठोपाठ औरंगाबामध्येही पदवीधर निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे. भाजपाचे किरण पाटील हे पिछाडीवर आहेत. किरण पाटील यांना १३ हजारांहून जास्त मतं मिळाली आहेत. सहा हजारांहून जास्त मतांनी विक्रम काळेंनी आघाडी घेतली आहेत.

14:28 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नागपूरमध्ये मविआच्या सुधाकर आडबालेंची विजयाकडे वाटचाल

नागपूमध्ये सुधाकर आडबाले यांना आत्तापर्यंत १३ हजार मतं पडली आहेत. मविआचे उमेदवार असलेले सुधाकर आडबाले हे आत्तापर्यंत सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष सुरू केला आहे. या निवडणुकीत प्राधान्याने एकच मुद्दा होता की जुनी पेन्शन योजना झाली पाहिजे. भाजपाचे नागो गाणार मागे पडले आहेत, कारण ते ज्या पक्षाकडून उभे होते त्या पक्षाला ही भूमिका मान्य नाही असं आडबाले यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

14:12 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: अमरावतीत पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर

अमरावती पदवीधर : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. विद्यमान आमदार आणि भाजप उमेदवार रणजीत पाटील पिछाडीवर

मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या मतांचे गठ्ठे धीरज लिंगाडे यांच्यासाठीचे. दुपारी ३ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्याची शक्यता

13:32 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: अमोल मिटकरींचं खोचक ट्वीट!

कोकण पदवीधर मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले प्रथम त्यांचे अभिनंदन. EVM पेक्षा बॅलेट वर सुद्धा भाजप निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झाले. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका भाजपाने EVM ऐवजी बॅलेट वर घेण्याचे औदार्य दाखवावे. - अमोल मिटकरी

https://twitter.com/amolmitkari22/status/1621049755496480768

13:15 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: सत्यजीत तांबे भाजपात जाणार?

सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार नाहीत. मी एवढंच सांगितलं की तांबे कुठल्या पक्षात गेलेले नाहीत. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केला आहे ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही विधानपरिषदेत अपक्ष म्हणून राहता, त्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ शकत नाहीत. तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता. तांबे निवडून येतील अशी मला १०० टक्के खात्री आहे. - दीपक केसरकर

वाचा सविस्तर

12:44 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: औरंगाबादमध्ये मविआ आघाडीवर, भाजपाची पिछाडी

औरंगाबादमध्ये मविआचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर असून भाजपाचे किरण पाटील पिछाडीवर पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे कोकणात भाजपानं मोठ्या बहुमतानं पहिल्या विजयाची नोंद केली असताना औरंगाबादमध्ये भाजपाला संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येत आहे.

12:31 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: "मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे रात्री-बेरात्री जाऊन...", ज्ञानेश्वर म्हात्रेंची विजयानंतर प्रतिक्रिया!

हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा आहे. गेल्या ६ वर्षांतल्या कामाची पोचपावती शिक्षकांनी दिली आहे. ३३ संघटनांचा मला पाठिंबा होता. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आज सुफळ झालाय. त्यावरच आज हा विजय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रलंबित प्रश्नावर मी आंदोलनं केली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे रात्री-बेरात्री जाऊन हा प्रश्न सोडवला होता. आता पेन्शनचा प्रश्नही मला सोडवायचा आहे. गेल्या ६ वर्षांत शिक्षक नसलेल्या माणसाने आम्हाला मागे टाकलं होतं. हा बदला त्याचा घेतला आहे शिक्षकांनी - ज्ञानेश्वर म्हात्रे

12:24 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कोकणात मविआच्या पाठिंब्यानंतरही बाळाराम पाटलांचा पराभव

या निवडणुकीत मला अनपेक्षित असा निकाल समोर आला आहे. मी निवडणुकीसाठी ज्यांनी सहकार्य केलं, त्यांचे आभार व्यक्त करतो. कोकणच्या शिक्षकांचा कौल खुल्या दिलानं मान्य करतो. आलेला निकाल मान्य करून पुढे मार्गक्रमण करण्याचा माझा विचार आहे - बाळाराम पाटील, शेकापचे उमेदवार

12:20 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रेंना २० हजाराहून जास्त मतं!

कोकण मतदारसंघातील शिक्षकांचे आभार मानेन की त्यांच्या एकजुटीमुळे ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाचही जिल्ह्यातील मंत्री, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या पाठिशी होते. या मतदारसंघात आजपर्यंत फक्त शिक्षक आमदार झाले आहेत. तीच परंपरा शिक्षकांनी राखली आहे - ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या बंधूंचा दावा

12:17 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: "..त्यांनी दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फसवलं आणि..."

नाशिक विभाग पदवीधरची निवडणूक चर्चेत होती. पण एका उमेदवाराने दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फसवलं. दोन्ही राष्ट्रीय पक्ष त्याच्यामागे उमेदवारी घेऊन फिरत होते. पण त्यानं उमेदवारी न घेता अपक्ष उमेदवारी घेतली. दोन्ही पक्षांची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील राजकारण कसं चालतं, हे पहिल्यांदा स्पष्ट झालं - सुभाष जंगले, अपक्ष उमेदवार, नाशिक

12:09 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: संगमनेरमध्ये सत्यजीत तांबेंच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुण्यापाठोपाठ संगमनेरमध्येही सत्यजित तांबे यांच्या विजयाचे निकालाआधीच बॅनर झळकले. स्थानिक कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावल्याचं सांगितलं जात आहे.

12:04 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: शंभूराज देसाईंना शिंदे गट-भाजपा युतीच्या बहुमताची खात्री!

आम्ही या निवडणुकीचं चांगलं नियोजन केलं होतं. मतदारांपर्यंत पोहोचून आम्ही चांगली तयारी केली आहे. आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा आणि मित्रपक्षांना मिळेल - शंभूराज देसाई, शिंदे गटाचे आमदार

12:03 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कोकणात भाजपाचे उमेदवार आघाडीवर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये कोकणात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर...

12:01 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: अमरावतीमध्ये १९२ मतं ठरली वैध!

अमरावतीमध्ये स्वयंघोषणा पत्र अर्थात सेल्फ अॅफिडेविट सादर न केल्यामुळे ७३ मतं ठरली बाद!

11:36 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नागपुरात नागो गाणार की सुधाकर आडबाले?

नागपुरात माझ्या बाजूने कल दिसून येत आहेत. सर्वाधिक पसंती क्रमांक माझ्याबाजूने असल्याचं दिसत आहे. पहिल्या फेरीतील ट्रेंड शेवटपर्यंत कायम राहील. मी निवडून येईन हे नक्की आहे - सुधाकर आडबाले, मविआचे उमेदवार

11:12 (IST) 2 Feb 2023
अमरावती पदवीधर मतदार संघात मतमोजणी सुरू, निकालाची उत्‍कंठा

विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने  निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. मतमोजणीला बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे सकाळी ८ वाजतापासून सुरूवात झाली.

सविस्तर वाचा

11:10 (IST) 2 Feb 2023
नागपूर : उत्सुकता शिगेला, मतमोजणी सुरू, गाणार, अडबाले की झाडे?

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजतापासून सुरुवात झाली असून शिक्षकांचा कौल विद्यमान आमदार नागोराव गाणार यांच्या बाजूने जाणार की माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले वा शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यापैकी एका नवीन चेहऱ्याला संधी मिळणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.

सविस्तर वाचा

10:42 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: आमच्या सर्व जागा निवडून येतील - अर्जुन खोतकर

विधानपरिषद निवडणुकीत आमच्या सर्व जागा निवडून येतील, अर्जुन खोतकरांचा दावा!

Mlc election result, MLC election maharashtra Live

Maharashtra mlc election result 2023 Live: पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल

Teachers-Graduate MLC Election Live Update: शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?