ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील मंत्रिपदावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित आहेत. यातील मलिद्याची खाती फडणवीसांकडे असल्याचं सांगून अंधारे यांनी टीकास्र सोडलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॉबिनहुड आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

“२०२३ मध्ये राज्यात निवडणूका लागणार; भाजपामध्येच प्रचंड…”; सुषमा अंधारेंनी सांगितलं ‘कामाला लागा!’

“देवेंद्र फडणवीसांकडे सर्व महत्त्वाची खाती आहेत. गृह खातं, वित्त खातं, जलसंधारण खातंही त्यांच्याकडे आहे. जेवढा म्हणून मलिदा असेल, ती सर्व खाती फडणवीसांकडे आहेत. ते सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत”, अशी टीका अंधारे यांनी केली आहे. तर दुसरीकडे “ज्या ठिकाणी लोकांचा संताप अंगावर येऊ शकतो, ती खाती एकनाथ शिंदेंकडे आहेत”, असं त्यांनी म्हटलं आहे.

“नेहरूंनी एका महिलेसाठी भारताची फाळणी केली आणि १२ वर्षे…”, सावरकरांच्या नातवाचे गंभीर आरोप

“आमच्या एकनाथ भाऊंकडे मंत्रीपद नाही का? आमचे भाऊ तर मुख्यमंत्री आहेत, त्यांचा नाद करायचा नाही. परंतू ते कसे मुख्यमंत्री आहेत? आमच्या भाऊंनी कोणत्याही फाईलवर सही करायची ठरवली, तर ती फाईल देवेंद्र फडणवीसांकडे जाते”, असा आरोप अंधारेंनी केला आहे. “भाजपा आणि टीम देवेंद्रकडून हे ठरवून केलेलं षडयंत्र आणि रणनिती आहे”, असंही त्या म्हणाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचा माईक काढून घेतात, म्हणत अंधारेंनी शिंदेंची खिल्लीदेखील उडवली आहे.

“तुमचं नाव बदलून आगलावे ठेवा”, सुषमा अंधारेंना आशिष शेलारांचा खोचक सल्ला, प्रत्युत्तर देत अंधारे म्हणाल्या, “तर मग…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याबाबत सुषमा अंधारेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. “कामाला लागा! २०२३ मध्ये निवडणुका लागणार म्हणजे लागणार” असं म्हणत अंधारे यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच विद्यमान सरकार कोसळेल, असं भाकित केलं आहे. भाजपामुळेच हे सरकार कोसळेल, असा दावाही त्यांनी केला आहे.