भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सध्या पक्षाच्याच आयटी सेल विरोधात बंड पुकारलेलं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी आयटी सेलच्या अमित मालवीय यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, स्वामी यांच्यावर सोशल हल्ले करणाऱ्याविषयी एका व्यक्तीनं ट्विट केलं होतं. त्यावर बोलताना स्वामी यांनी सोशल हल्ले करणाऱ्या व्यक्तीविषयी गौप्यस्फोट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील भूमिकांवरून चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वपक्षाच्या आयटी सेलविरोधातच आघाडी उघडली असून, भाजपाध्यक्षांनाही अल्टीमेट दिला आहे. दरम्यान, एका व्यक्तीनं स्वामी यांना त्यांच्यावर सोशल मीडियातून हल्ले करणाऱ्या व्यक्तीबद्दल ट्विट करून माहिती दिली.

त्या ट्विटला उत्तर देताना स्वामी म्हणाले,”हाच तो दाऊदचा उजवा हात आणि शरद पवार यांचा चेला आहे, ज्याला त्यांनी माझ्या २जी प्रकरणानंतर नाकारले,” असं त्यांनी सांगितलं. मात्र, स्वामी यांच्या या खळबळजनक माहितीनंतर ही व्यक्ती नेमकी कोण यावरून आता प्रश्न उपस्थित होत आहे.

यापूर्वीही शरद पवारांवर साधला होता निशाणा

पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना सुनावलं होतं. त्यानंतर स्वामी यांनी ट्विट करून पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पवार कुटुंबातील या घटनांवरून भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पवार कुटुंबीयातील कलहाबद्दल मोठं भाष्य केलं होतं. “राष्ट्रवादी काँग्रेस अतंर्गत कलहामुळे संकटात आहे. कारण शरद पवार आणि अजित पवार यांची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. निरज गुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्या सिंगापूरचे नागरिकत्व व कंपन्यांच्या मुद्दा उचलून धरला आहे. संचालकांनी सीबीआयच्या चांगल्या अधिकाऱ्यांची टीम निवडली आहे. फॉरेन्सिक चौकशीही डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे आहे,” असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: That is dawoods right hand man and sharad pawars chela says subramanian swamy bmh
First published on: 10-09-2020 at 12:21 IST