उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या पाच हजारांवर!
नगर : जिल्ह्यात आज, रविवारी ९४३ करोना बाधित आढळले तर १ हजार १२ रुग्ण करोनामुक्त झाले. मात्र उपचाराधीन १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ६ हजार १९५ झाली.
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८८ हजार ७०८ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१९ टक्के झाले आहे. रूग्णसंख्येत ९४३ ने वाढ झाल्याने उपचाराधीन रुग्ण संख्या ५ हजार २३६ झाली आहे.
आज आढळलेले बाधित पुढीलप्रमाणे— संगमनेर १२८, जामखेड १३०, शेवगाव १००, श्रीगोंदे ८२, कर्जत ८०, पारनेर ७८, पाथर्डी ५६, राहुरी ५४, श्रीरामपूर ४९, राहता ४०, नेवासे ३७, साकोली ३६, कोपरगाव ३२, नगर तालुका २८, जिल्ह्यतील २३, नगर शहर १६, भिंगार १.
आज करोनामुक्त झालेले पुढीलप्रमाणे— मनपा २३, अकोले ५२, जामखेड १७८, कर्जत ७३, कोपरगाव १९, नगर तालुका ६६, नेवासा ५७, पारनेर २०८, पाथर्डी ५८, राहता २५, राहुरी ४२, संगमनेर ७०, शेवगाव ९६, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर १९, इतर जिल्हा ११.
जिल्ह्याची आकडेवारी
बरे झालेली रुग्ण संख्या:२,८८,७०८
उपचार सुरू असलेले रूग्ण:५२३६
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६२०९
एकूण रूग्ण संख्या:३,००,१५३