सांगली: अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्‍या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षे कारावास व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा मंगळवारी ठोठावली. दंडातील सर्व रक्कम पिडीतेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

पिडीतेच्या घरी आरोपी राजेबाकसर राजेसाब पिरजादे (वय ५९ रा.वाल्मिकी आवास योजना सांगली) हा सुतार कामासाठी आला होता. पिडीता शाळेहून आल्यानंतर चेंडूने खेळत होती. खेळत असताना चेंडू सुतार काम करीत असलेल्या आरोपीकडे गेला. यावेळी चेंडू आणण्यासाठी पिडीता गेली असता त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. हा प्रकार तिने आईला सांगितला. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात पिडीतेच्या आईने तक्रार दाखल केली होती.

Special court order BJP MP Pragya Singh
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित राहा, साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष न्यायालयाचे आदेश
muslim community protest against neha hiremath murder
मुस्लिम समाजाने केला नेहा हिरेमठ हत्येचा निषेध
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा

हेही वाचा… VIDEO : गद्दारी, हिंदुत्व अन् शिवसेना; श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत आणि नारायण राणे लोकसभेत भिडले

पोलिसांनी तपास करून आरोपीविरूध्द आरोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. न्या. डी.एस. हातरोटे यांनी आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारपक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.