सांगली : मिरज व विटा येथे आगीच्या दोन घटना घडल्या असून कोणालाही इजा झाली नसली तरी लाखो रूपयांची हानी झाली. दोन्ही ठिकाणी विद्युत उपकरणातील बिघाडामुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिरज येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यालगत असलेल्या सुश्रुता हॉस्पिटलच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागल्याचे लक्षात आले. तात्काळ काही कार्यकर्त्यांनी याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवली. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली.

students died in road accident in jalgaon
जळगाव जिल्ह्यातील अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू
bikes become expensive due to high tax says rajiv bajaj
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट
one dead in lightning strikes
बुलढाण्यात पुन्हा अवकाळीचे थैमान; वीज पडून एकाचा मृत्यू, घरावर झाड कोसळले
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व

हेही वाचा – गृहमंत्र्यांच्या शहरात आणखी दोन हत्याकांड… उपराजधानातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर

हेही वाचा – एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करणार

विटा येथे बाजारपेठेत महात्मा गांधी चौकालगत असलेल्या मयूर स्टेशनरी दुकानच्या गोदामाला शनिवारी सकाळी आग लागली. बाजार पेठेत आग लागल्याने आजूबाजूच्या दुकानदारांसह रहिवाशांचीही धावपळ उडाली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने सलग तीन तास बचाव मोहीम राबवत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत वह्या, पुस्तके, स्टेशनरी साहित्य जळून खाक झाले. अंदाजे पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.