नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात आणखी दोन हत्याकांड घडले. दोन्ही हत्याकांड नंदनवन परिसरात घडले असून नंदनवन पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. पहिल्या घटनेत लकडगंजमधील जुगार अड्डा चालविण्यासाठी झालेल्या पैशाच्या वादातून तीन ते चार युवकांनी धारदार शस्त्रांनी दोन मित्रांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. हा थरार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नंदनवनमधील संघर्षनगर झोपडपट्टी परिसरात घडला. नीरज शंकर भोयर (३०, गरोबा मैदान, लकडगंज) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विशाल भगवान राऊत (३२, क्वेटा कॉलनी) असे गंभीर जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या पंधरवड्यातील पाचवे हत्याकांड असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लकडगंज परिसरात पोलिसांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे मोठमोठे जुगार अड्डे सुरु आहेत. विलास ऊर्फ मटर रामकृष्ण वानखडे (हिवरीनगर) व नीरज भोयर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. रात्री अकरा वाजताच्या सुमारास संघर्षनगर झोपडपट्टीत नीरज आणि विशालवर विलासने आपल्या साथिदारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात नीरज भोयर याचा मृत्यू झाला तर विशाल हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
aap leaders nationwide protests against arvind kejriwal s arrest
‘आप’ नेत्यांची देशव्यापी निदर्शने; लोकशाहीवर हल्ला असल्याचा आरोप करत नेते रस्त्यावर

हेही वाचा : “ईडी-सीबीआयमुळे घाबरलेल्या काँग्रेसची भूमिका मिळमिळीत”, मित्रपक्षाने केलेल्या आरोपामुळे काँग्रेसची कोंडी

दुसऱ्या हत्याकांडात, सचिन यशवंत उईके (३०, जुना बगडगंज) हा कारचालक होता. तो आरोपी दर्शन रवींद्र भांडेकर (२३, बाभूळबन) याच्याकडे कारचालक म्हणून नोकरी करीत होता. सचिन गेल्या दोन दिवसांपासून कामावर जात नव्हता. त्यामुळे आरोपी मालक दर्शन हा चिडून होता. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जुना बगडगंज चौकात सचिन उभा होता. दरम्यान, दर्शन तेथे आला. दर्शनने सचिनला कामावर येत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. सचिनला मानेवर जोरात फटका मारला. त्यामुळे सचिन बेशुद्ध पडून मृत पावला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी सुरुवातीला आरोपी दर्शनला वाचविण्याचा प्रयत्न केला. शेवटी नातेवाईकांच्या दबावानंतर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपी दर्शन भांडेकरला अटक केली.