कोल्हापूर : करवीर नगरीतील जुन्या कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत शिंदे – कणेरकर आघाडीची सरशी झाली. सर्व १५ जागा मोठ्या फरकाने जिंकून त्यांनी विरोधी निगडे – जाधव गटाला जोरदार धक्का दिला. कोल्हापूर अर्बन बँकेला शतकोत्तर परंपरा आहे. बँकेचा गेल्या काही कालावधीतील कारभार वादग्रस्त झाला होता. सत्ताधारी गटातून बाहेर पडलेल्या संचालकांनी टीका टिप्पणी चालवली होती. त्यामुळे निवडणूक लागण्यापासूनच वातावरण तापले होते.

बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्या जुन्या पॅनलला माजी अध्यक्ष उमेश निगडे, संचालिका गीतादेवी जाधव यांच्या राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनलने आव्हान दिले होते.रविवारी चुरशीने ४८ टक्के मतदान हे मागील निवडणुकीपेक्षा ८ टक्के अधिक असल्याने निकालाचा कल कसा राहणार याची उत्सुकता होती. मात्र आज कणेरकर -शिंदे पॅनलने सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली. या आघाडीने विरोधकांपेक्षा दुप्पट मते घेऊन मतदारांचा कौल आपल्या बाजूने असल्याचे दाखवून दिले.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
utkarsha rupwate, Shirdi, vanchit,
नाराज उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेसचा राजीनामा, वंचितमध्ये प्रवेश; शिर्डीतून लढणार
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

हेही वाचा: कोल्हापूर: अतिक्रमणावरील कारवाईवरून सतेज पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले, “काही झालं तर…”

विजयी उमेदवार याप्रमाणे – शिरीष कणेरकर, संभाजी जगदाळे, राजन भोसले, रवींद्र धर्माधिकारी, नंदकिशोर मकोटे, अभिजीत मांगोरे, जयसिंग माने, मधुसूदन सावंत, प्रशांत शिंदे ,विश्वास काटकर, यशवंतराव साळोखे , सुनिता राऊत, संध्या घोटणे, नामदेव कांबळे, सुभाष भांबुरे