“ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध ३१ डिसेंबर २०२० रोजी सिडको ठाण्यात दिलेली बलात्काराची तक्रार खोटी आहे. यासंदर्भाने रचलेल्या कटात भाजपा नेत्या चित्रा वाघ व आष्टीचे आमदार सुरेश धस आहेत, असा आरोप करत यातील पीडितेने आपल्यावर शीतपेयात गुंगीचे औषध टाकून अत्याचार करून त्याची चित्रफित सर्वत्र पसरवण्याची व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने धस यांच्याकडून पैसे घेतले होते. ” असे जिन्सी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

त्यावरून अन्य दोन व्यक्तिंविरुद्ध शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदिमोद्दिन अलिमोद्दिन शेख व विशाल खिल्लारे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या संदर्भाने पीडितेने तक्रार दाखल झाल्याच्या माहितीला पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे व उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी दुजोरा दिला.

आपल्या एका मावशीकडून नदिमोनची ओळख लग्न करून देण्याच्या निमित्ताने करून देण्यात आली होती. नदिमोद्दीन हा मालेगावातील नगरसेवक असल्याचे सांगितले होते. नदिमोद्दीनने कुटुंबीयांशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने एका फ्लॅटवर वाहनातून नेले. सोबत विशाल खिल्लारे होता. फ्लॅटवर तासभराच्या गप्पांनंतर मला एका शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. शुध्दीवर आल्यानंतर आपण निर्वस्त्र होतो. त्या विषयी नदिमोद्दीनला विचारले तर त्याने शरीरसंबंधाची मोबाईल फोनमधील चित्रफित दाखवली व ती सर्वत्र पसरवण्यासह जीवे मारण्याची धमकी दिली. वारंवार अशी धमकी देऊन राष्ट्रवादीचा मोठा नेता असल्याचे आपल्याला सांगून मेहबूब शेख विरूद्ध बलात्काराची तक्रार देण्यास भाग पाडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेख यांना आपण कधीही पाहिले नव्हते व या दरम्यान चित्रा वाघ व सुरेश धस यांची भेट आष्टीत घडवून आणल्याचेही पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.