मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगाबादच्या नामकरणावरून वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने देखील या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. याच मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

शहरांची नावं बदलून जर देशाचा विकास होणार असेल तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावं बदला. पण हे केवळ ढोंग असून लोकांना मूर्ख बनवलं जात आहे, अशी टीका अबू आझमी यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आझमी म्हणाले, “देशात खूप मोकळी जमीन अस्तित्वात आहे. त्याठिकाणी नवीन शहरं बनवा आणि तुम्हाला हवं ते नाव द्या. पण त्यांना (शिंदे-फडणवीस सरकारला) एक संदेश द्यायचा आहे की याठिकाणी मुस्लीम नाव चालणार नाहीत.”

Narendra Modi congress manifesto Muslims comment Loksabha Election 2024
“काँग्रेस देशाची संपत्ती मुस्लिमांना देईल”, मोदींचा आरोप; जाहीरनामा काय सांगतो?
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ

हेही वाचा- चालू पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी केली एकनाथ शिंदेंच्या कानात कुजबूज, VIDEO व्हायरल

पुढे त्यांनी नमूद केलं की, “औरंगजेबचा इतिहास मोडून-तोडून चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे. आज देशाला स्वातंत्र होऊन ७०-८० वर्षे उलटली आहेत. देशावर अनेक वर्षे इंग्रजांची सत्ता होती. पण हेच नाव कायम होतं. आता औरंगाबादचं नामकरण करून मतदारांचं धृवीकरण केलं जातंय. यामध्ये सर्वात जास्त नुकसान देशाचं होत आहे. देशातील २० टक्के अल्पसंख्यांकावर प्रत्येक ठिकाणी अन्याय होत आहे. त्यांना मशिदीत नमाज पठण करता येत नाहीये, मशिदीसमोर कीर्तन म्हटलं जातंय, मशिदीवरील भोंगे उतरवले जात आहेत, शहरांचं नामकरणं केलं जातंय, यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होत आहे.”

हेही वाचा- “हीच ती वेळ” म्हणत आदित्य ठाकरेंनी युवासैनिकांना केलं आवाहन, म्हणाले…

“लोकांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याने देश प्रगतीकडे जाण्याऐवजी अधोगतीकडे जात आहे. शहरांची नावं बदल्याने जर देशाचा विकास होणार असेल, लोकांना नोकरी मिळणार असेल, भूक मिटणार असेल, महागाई कमी होणार असेल, तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावं बदला. पण हे केवळ ढोंग असून लोकांना मूर्ख बनवलं जात आहे. त्यामुळे मी देशातील लोकांना सांगू इच्छितो की, हे लोक देशाला बरबादीकडे घेऊन जात असून देशातील हिंदू-मुस्लीम एकता संपवत आहेत” असंही अबू आझमी म्हणाले.