महायुतीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पेच निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे विजय शिवतारे या जागेसाठी आग्रही आहेत. तर, अजित पवार गटाकडून या जागेवरून सुनेत्रा पवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाले असल्याने विजय शिवतारे बंडखोरी करण्याच्या भूमिकेत आहेत. यावरून ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विजय शिवतारेंना इशारा दिला आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते.

“एखाद्या कार्यकर्त्याने लढायचंच असं ठरवलं असेल तर आपण काही करू शकत नाही. ही लोकशाही आहे. अजित पवारांनी त्यांना सांगितलं आहे, की आपण महायुतीत आहोत आणि महायुतीत असताना अशी बंडखोरी करणं योग्य नाही. म्हणून उमेदवारीचा ते फॉर्म भरतील तेव्हा एकनाथ शिंदे कडक भूमिका घेतील. युतीत असताना विरोधात काम करणं शिंदेंना आवडणार नाही. म्हणून फॉर्म भरतील तेव्हा एकनाथ शिंदे निर्णय जाहीर करतील”, असं संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा >> “विजय शिवतारे बारामतीमधून लढू शकतात, पण…”, शिंदे गटाच्या भूमिकेमुळे गोंधळात भर

यादी लवकरच येणार

दरम्यान, जागा वाटपावरही ते बोलले आहेत. संजय शिरसाट म्हणाले, जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. उमेदवारांची नावे आणि जागा लवकरात लवकर आमचे पक्ष ठरवतील. परवापर्यंत ही यादी बाहेर येईल, असं शिरसाट म्हणाले.

त्यांचा वादात आमचा संबंध नाही

अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वादाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद गेल्या दहा वर्षांपासून आहे. त्यामुळे त्यांच्या वादात आमचा काही संबंध नाही”, असंही शिरसाटांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती जागा राष्ट्रवादीकरता सोडली असल्याने आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये जात आहेत. त्यांनी पक्ष सोडताना कोणावरही दोषारोप केलेले नाहीत. त्यामुळे ते महायुतीच्याच सरकारमध्ये येत आहेत, असं संजय शिरसाटांनी स्पष्ट केलं.