जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जिल्हा माहिती अधिकारी होण्याचे स्वप्न भंगणार आहे. लेखा विभागात नियुक्ती असल्यामुळे ते या पदावर दावा करू शकणार नाही, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनातर्फे जिल्हा माहिती अधिकारी या प्रथमश्रेणी पदाची २६ पदे भरली जात असून, त्यासाठी २३ जानेवारीपर्यंत अर्ज करायचे आहे. या पदासाठी कार्यालयात कार्यरत कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी ही एक संधी समजून वरिष्ठांना अनुभवाचे प्रमाणपत्र मागितले. मात्र, ते देण्यास नकार मिळाला. तुम्ही लेखा विभागात काम करता, मग तुम्हास बातमी, लेखाचा अनुभव कुठाय, असे विचारून टोलावण्यात आले. वरिष्ठांचा हा आक्षेप खराच आहे. मात्र, राज्यात माहिती सहाय्यक, उपसंपादक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने कार्यालयातील लिपीक, चपराशी, असे कर्मचारी अनुभवाने शासकीय बातमीदारीही करतात. हे सार्वत्रिक चित्र आहे. याच आधारे त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी होण्याचे स्वप्न रंगवले आणि तयारी आरंभली. पण त्यांचे स्वप्न भंगले आहे.

हेही वाचा – “…तर काँग्रेस केवळ निवडणूक पोस्टरवरच उरेल”, सुनील केदारांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना इशारा

हेही वाचा – “महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर अन्यायच केला”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तोंडी आदेशातून प्रसंगी बातमी किंवा शासकीय कार्यक्रम करतात. मात्र, लेखा विभागात नियुक्ती असल्याने ते या पदावर दावा करू शकत नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या निर्णयामुळे जिल्हा माहिती अधिकारी पदाची संधी हुकलेले कर्मचारी आता बातमी करायला सांगा, बघतोच मग, असे मनोमन बोलून रोष व्यक्त करीत आहेत.

More Stories onवर्धाWardha
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no promotion opportunity for employees of wardha district information office as information officer pmd 64 ssb
First published on: 22-01-2023 at 23:36 IST