मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून या बैठकीत एकूण १० निर्णय घेण्यात आले.

आज मंत्रिमंडळात घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय

  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार कि.मी. रस्ते व पुलाची कामे
  • ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार रुपये.
  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य. आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा.
  • उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा
  • सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास
  • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना
  • राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार , गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय
  • औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. ५० टक्के मुद्रांक शुल्क सवलत
  • भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय

maldives president mohamed muizzu marathi news
विश्लेषण: मालदीवमध्ये चीनधार्जिण्या अध्यक्षांचा ‘दुसरा’ विजय… भारतासाठी हा निकाल किती महत्त्वाचा?
Supreme Court Asks If Voters Can Get VVPAT Slip
निवडणुकीचे पावित्र्य टिकावे; सर्वोच्च न्यायालयाचे मत, सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीचा निर्णय राखीव
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Bhaskar Bhagre and Bharti Pawar
दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांविरोधात मविआकडून शिक्षक मैदानात