या वर्षी निवडणूक आयोगाकडून पर्यावरण पूरक निवडणूक घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लातुरातील राजकीय पक्षांच्या बैठकीत सर्वाना स्वागतासाठी वृक्ष रोपटे भेट दिली तर त्याच्या खर्चाची रक्कम केवळ एक रुपया लावली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आयोजित पत्रकार बैठकीत सांगितले. यातून वृक्षलागवड वाढावी व लोकांपर्यंत चांगला संदेश जावा, हा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघांतील शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली.
लातूर जिल्ह्य़ातील सहा मतदार संघांतील एकूण मतदारांची संख्या १९ लाख १४ हजार ६५९ असून त्यापकी पुरुष मतदारांची संख्या दहा लाख नऊ हजार ४०२ तर स्त्री मतदारांची संख्या नऊ लाख २३७८ आहे. सनिक मतदारांची संख्या २८८७ इतकी आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यत एकूण मतदारांची संख्या ७०.८० टक्के इतकी असून ज्या मतदारांचे छायाचित्र काढण्यात आलेली आहेत, अशा मतदारांची संख्या ९७.६९ टक्के इतकी आहे. जिल्ह्यतील लातूर शहर विधानसभा मतदार संघ हा सर्वाधिक मतदार असणारा आहे. या मतदार संघात तीन लाख ७२ हजार २१ इतकी मतदारसंख्या असून औसा मतदार संघ सर्वात कमी २ लाख ८३ हजार ७९२ इतके मतदार असणारा आहे. दिव्यांग मतदान केंद्र याहीवेळी सहाही मतदार संघात असणार असून लोकसभेच्या वेळी देशात फक्त लातूर जिल्ह्यत हा प्रयोग करण्यात आला होता. एका मतदान केंद्रात सर्व अधिकारी कर्मचारी दिव्यांग राहतील शिवाय राजकीय पक्षांना त्यांनी पोिलग एजंट नेमताना दिव्यांगांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येते, याबरोबरच सखी मतदान केंद्राची संकल्पनाही सहाही विधानसभा मतदार संघात राबवली जाणार आहे, त्यात सर्व कर्मचारी महिला असतात व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना पोिलग एजंट ही महिलाच असाव्यात, असे आवाहन करण्यात येते. यातून मतदारांच्या समोर एक वेगळी प्रतिमा निर्माण होते.
क्यू आर कोड बुक संकल्पना : प्रशासनाने क्यू आर कोड बुक ही आगळीवेगळी संकल्पना या वेळी अमलात आणली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या संकल्पनेचे कौतुक केले आहे. निवडणूक प्रक्रियेतील सर्वच बाबींची लेखी माहिती असून त्यासोबत कोड देण्यात आला आहे. मोबाइल द्वारे कोड स्कॅन केल्यानंतर त्याची व्हिडिओ क्लिप आपोआप तयार होते. त्यामुळे मतदान केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन आपोआप होते.
टंचाईकाळात टँकरने पाणीपुरवठा : जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. निवडणूक प्रक्रियेच्या काळात शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरूच राहणार आहे, त्याचा आचारसंहितेशी कोणताही संबंध नसल्याचे जी श्रीकांत यांनी सांगितले .पत्रकार परिषदेत आचारसंहिता विभागाचे प्रमुख डॉ. बिपिन इटनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे उपस्थित होते.