अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याची चित्रफीत करुन मुलीच्या वडिलांकडून खंडणी उकळणा-या तिघांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत लोणंद पोलिसांनी सांगितले की, प्रशांत उर्फ परशुराम नारायण धायगुडे याने १६ जून २०१३ पासून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करुन त्याची चित्रफीत करुन इतर दोन मित्रांना दाखविली. त्यानंतर मुलीच्या वडिलांना बदनाम करण्याची भीती दाखवून सहा लाख पंचवीस हजार रुपयाची खंडणी वसूल केली. मुलीने जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाला याची माहिती दिली.त्यानंतर लोणंद पोलिसात या गुन्हयाची नोंद करण्यात आली. या प्रकरणी प्रशांत धायगुडेसह त्याचे मित्र सुशील सुहास घोडके (२१)व विकी उर्फ विकास नबाजी माने (२२)तिघेही रा. खेड बुद्रुक ता. खंडाळा यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ए. डी. फडतरे करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three arrested in rape case
First published on: 16-07-2014 at 03:44 IST