मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा- पंढरपुर रस्त्यावरील म्हसवड जवळच्या पिलीव घाटात चार ते पाच अज्ञात दरोडखोरांनी एसटी व मोटरसायकल चालकावरही दगडफेक केल्याची घटना घटना घडली आहे. यामध्य़े मोटारसायकलचा चालक व बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माळशिरस व म्हसवड पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
दारोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या दरोडेखोरांनी गाड्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी एसटी बसवर व मोटारसायकलवर दगडफेक केली. यामध्ये मोटारसायकलीवरुन चाललेल्यांना आणि बसच्या ड्रायव्हरला प्रवाशांना दगड लागला असून यामध्ये ते जखमी झाले आहेत. मात्र अद्याप कोणतीही चोरीची घटना झाली नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.