Coronavirus : राज्यात आज दिवसभरात १ हजार ६८२ जण करोनामुक्त; १ हजार ५५३ नवीन करोनाबाधित

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३८ टक्के

Corona Maharashtra
राज्यात आज रोजी एकूण २९,६२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (संग्रहीत)

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. शिवाय, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात १ हजार ६८२ रूग्ण करोनामधून बरे झाले, तर १ हजार ५५३ नवीन करोनाबाधित आढळले. याचबरोबर, २६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१६,९९८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३८ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,८९,९८२ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९७६० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०९,०९,९९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८९,९८२(१०.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३४,८०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज रोजी एकूण २९,६२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Today 1682 people were cured from corona in the state msr

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या