सांगली : आमचा समाज परंपरेने शेती करतो, यामुळे आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. याबाबतचे निवेदन समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले.आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर यंत्रणा कार्यरत असून अनेक परंपरागत पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर लिंगायत समाजानेही कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, समाजातील अनेकांच्या नावे शेती आहे, समाज परंपरागत शेती व्यवसाय करतो, त्यामुळे आमचीही गणना कुणबीमध्येच होत असल्याने तसे प्रमाणपत्र मिळावे अशी  मागणी सकल लिंगायत मोर्चाने केली आहे.लिंगायत समाजाचा  समावेश इतर मागास प्रवर्गात करावा. लिंगायतातील सर्वच समाजघटक इतर मागास प्रवर्गात समाविष्ट नाहीत. मात्र ते पिढ्यानपिढ्या शेती करत असल्याने कुणबी प्रवर्गासाठी पात्र आहेत. त्यांचा सरसकट समावेश कुणबी म्हणून इतर मागास प्रवर्गात करावा. शासनाच्या अभिलेखात तसा उेख नसल्याने इतर मागास दाखले मिळत नाहीत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. शासनातर्फे सध्या मराठा कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरु आहे. त्यावेळी लिंगायत कुणबी, कुणबी लिंगायत, कुणबी माळी, तेली कुणबी, कुंभार कुणबी, सुतार कुणबी, कोळी कुणबी, साळी कुणबी, लोहार कुणबी अशा नोंदीही सापडत आहेत. त्यामुळे हे सर्व समाजघटक कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि पर्यायाने इतर मागास प्रवर्गासाठी पात्र आहेत. त्यांचा सरसकट समावेश इतर मागास प्रवर्गात करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

cleaning dirt by hand, banning laws,
हाताने मैला साफ करण्याची कृप्रथा : बंदी घालणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, उच्च न्यायालयाचे आदेश
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !