हल्ली इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी भन्नाट आयडिया वापरतात. या रील्समधून लोकांची क्रिएटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. परंतु काहीजण असे रील्स बनवण्याच्या नादात भलत्याच गोष्टी करतात. बऱ्याचदा अशा विचित्र गोष्टी केल्याने ही मुलं अडचणीत सापडतात. असाच एक प्रकार मुंबईजवळच्या वसईच्या किल्ल्यावर पाहायला मिळाला आहे. वसई किल्ल्यावर आलेल्या एका हौशी पर्यटकाने इंस्टाग्राम रील बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील एका चर्चमध्ये आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या घटनेमुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप दुर्गप्रेमी करत आहेत. काही दुर्गप्रेमींनी याप्रकरणी पुरतत्व विभागाकडे तक्रार केली असून या तरुणावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.

एका हौशी तरुणाने वसई किल्ल्यात इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी किल्ल्यावरील चर्चमध्ये आग लावली. यामुळे किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केला आहे. एका दुर्गप्रेमी तरुणाने सांगितलं की, या किल्ल्यात फ्रान्सिस्कन हे ऐतिहासिक चर्च आहे. हे चर्च तब्बल ५०० ते ६०० वर्ष जुनं आहे. एक तरुण येथे आला आणि त्याने इन्स्टाग्राम व्हिडीओ बनवण्यासाठी या चर्चमधील एका शिलालेखावर एक आकृती काढली. त्या आकृतीवर त्याने ज्वलनशील द्रव्य टाकून आग लावली. त्यानंतर तो व्हिडीओ चित्री करत होता.

हे ही वाचा >> घर अवघ्या दोन किलोमीटरवर असताना काळाने गाठलं, पंढरपूरवरून परतणाऱ्या तीन भाविकांचा दुर्दैवी अंत, ७ जण गंभीर

या दुर्गप्रेमी तरुणाने सांगितलं की, किल्ल्यात आग लावणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार करण्यासाठी आम्ही पुरातत्व विभागाशी संपर्क साधला. परंतु आम्हाला त्यांच्याकडून समाधानकरक उत्तर मिळालं नाही. दरम्यान, किल्ल्यात आग लावणाऱ्या तरणावर कारवाई करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist set fir in vasai fort church archeology department ignored says fort activists asc
First published on: 22-05-2023 at 11:49 IST