चरी गावात बायोडिझेलयुक्त ऊर्जावृक्ष

उंडी हे झाड क्षार सहनशील असून ही झाडे नसíगकरीत्या समुद्रकिनारी किंवा खार जमिनीमध्ये उगवलेली आढळतात.

उंडी हे झाड क्षार सहनशील असून ही झाडे नसíगकरीत्या समुद्रकिनारी किंवा खार जमिनीमध्ये उगवलेली आढळतात. याचा विचार करून समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी त्यांच्या मूळ गावी चरी, तालुका अलिबाग येथे उंडीची ५३५ रोपे लावून वृक्षारोपण केले. या वेळी उपस्थितांना मनोज थळे गुरुजींनी उंडी झाडाचे महत्त्व समजावून सांगितले. उंडीचे झाड सदाहरित असून त्याची पाने अतिशय सुंदर दिसतात. या झाडाला सुलतान चंपा, नागचंपा या नावांनी ओळखण्यात येते. झाडाच्या बीमध्ये ५० ते ८० टक्के तेल असते. कोकण कृषी विद्यापीठाने ङङश्उछ03 ही उंडीची प्रजाती निवडपद्धतीने शोधली आहे. या प्रजातीच्या उंडीच्या बीमध्ये ७९.३४ टक्के तेल उपलब्ध असते. याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठाने या तेलापासून बायोडिझेल निर्मितीची पद्धतीही विकसित केली आहे. उंडीच्या झाडाचा उपयोग वारा व धूपप्रतिबंधक म्हणूनही होतो. ग्लोबल वॉìमगमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. खाडी/ समुद्राचे बंधारे फुटून या सुपीक शेतजमिनी नापीक होत आहेत. यावर उपाय म्हणजे बंधारे मजबूत करणे. खार जमिनीच्या बंधाऱ्यावरही उंडीची लागवड केल्यास बंधारे सुरक्षित राहतील. उंडीप्रमाणेच करंज हे झाडही क्षार सहनशील आहे. त्याच्या बियांपासूनही तेल काढण्यात येते. याचा वापर बायोडिझेल करण्यासाठीही करता येतो. करंज पेंडचा उपयोग सेंद्रिय खत म्हणूनही करण्यात येतो. खार जमीन क्षेत्रामध्ये उंडी व करंज याच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामधून रोजगारनिर्मिती होईल तसेच डिझेलसाठी मोठय़ा प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते यामध्ये काही प्रमाणात बचत होईल.

चरी ते खोपणे या परिसरातील खार जमिनीतील रस्त्यालगत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी उंडीची उत्साहाने लागवड केली. काही दिवसांनंतर आणखी उंडीच्या झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे प्रमोद जाधव यांनी बोलताना सांगितले.

*************

सिंधुदुर्गात वृक्षारोपण

सावंतवाडी : झाडे लावा झाडे जगवा या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यालयाच्या आवारात ३५ झाडांची लागवड करण्यात आली आहे. या वेळी प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी अरुण परुळेकर, अप्पर कोशागार अधिकारी संजय कुंभार, उपकोशागार अधिकारी नंदकिशोर गंगावणे तसेच कार्यालयातील कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले आहे.

आज लोकशाही दिन

माहे जुलै २०१६ या महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याचा पहिला सोमवार, दिनांक ४ जुलै २०१६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत राबविण्यात येईल. त्याचबरोबर दुपारी ३.३० वाजता जिल्हा संनियंत्रण समितीची सभा घेण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ११५.४५ मि.मी. सरासरी पाऊस

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी ११५.४५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यातील पाऊस पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटर परिमाणात आहेत.) दोडामार्ग-१०२, सावंतवाडी-११४, वेंगुर्ला- १०२.६०, कुडाळ–११०, मालवण-७६, कणकवली-१५५, देवगड-१३०, वैभववाडी-१३४. दिनांक १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्य़ात एकूण १२९१.३० मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tree plantation project in alibag