पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून आदिवासी तरुणाची हत्या

पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी बुधवारी रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथील एका इसमाची हत्या केली.

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून आदिवासी तरुणाची हत्या
प्रतिनिधिक छायाचित्र

गडचिरोली: पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी बुधवारी रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथील एका इसमाची हत्या केली.

लकीकुमार ओक्सा (३८) असे मृत इसमाचे नाव आहे. मृतक बिनागुंडा येथील मूळ रहिवासी होता. तो मलमपोडूर येथे तेंदूपत्ता फळीवर मुंशी म्हणून काम पाहत होता. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी मलमपोडूर येथे आले.

त्यांनी लकीकुमारला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि नंतर धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol Diesel Price Today: २३ जूनला पेट्रोल आणि डिझेलचा महाराष्ट्रातील दर किती?
फोटो गॅलरी