नगर : राज्यस्तरीय पुरुषोत्तम नाटय़करंडक स्पर्धेत नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालय संघाने सादर केलेल्या ‘सहल’ एकांकिकेस सांघिक द्वितीय पारितोषिक व हरि विनायक करंडक तसेच कलाकारांनी वैयक्तिक चार पारितोषिके मिळवली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल हिंदू सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी कलाकारांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला.   विद्यार्थ्यांचे कौतुक करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक म्हणाले,की महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये मोठे यश संपादन करत आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. ‘पुरुषोत्तम करंडक’ सारख्या प्रतिष्ठित नाटय़स्पर्धेमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना मोठा आनंद होत आहे.

कार्याध्यक्ष अजित बोरा, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, महाविद्यालय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंत फडणीस, सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख प्रकाश जाधव आदींनी विद्यार्थी कलाकारांचे कौतुक करताना पारितोषिक प्राप्त एकांकिकेचे विशेष प्रयोग आयोजित करण्याचे मान्य केले. 

Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
  • ‘सहल’ एकांकिकेत सहभागी चमू: लेखक- निरंजन केसकर, दिग्दर्शक- आविष्कार ठाकूर, प्रकाश योजना- स्वराज अपूर्वा, यश तिरोडकर व समर्थ खळदकर, संगीत- आविष्कार ठाकूर व संकेत दंडवते. नेपथ्य- वैष्णवी लव्हाळे, विशाल साठे, रंगमंच व्यवस्था- समर्थ अरुणे, मंजिरी जोशी, आर्या बालटे, सार्थक फुटाणे व अनुष्का पंडित. कलावंत – श्रुता भाटे, गौरी डांगे, मनु शर्मा, निरंजन केसकर. 
  • चार वैयक्तिक पारितोषिके  ‘सहल’ एकांकिकेने सांघिक द्वितीय क्रमांकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आविष्कार ठाकूर, सर्वोत्कृष्ट अभिनय- गौरी डांगे, अभिनय उत्तेजनार्थ- निरंजय केसकर व श्रुता भाटे यांनी वैयक्तिक पारितोषिके मिळविली.