पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या अंगावर सुरीने वार करुन आत्महत्या करण्याचा खळबळजनक प्रकार काल, शनीवारी दुपारी नेवासे तालुक्यातील पिंप्री शहाजी गावात घडला. पतीला नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दत्तु पिराजी कुऱ्हाडे हा मजुरी काम करतो, काल त्याने दारुच्या नशेत पत्नी भामाबाईशी भांडण केले. त्याच रागात त्याने भामाबाईचे डोके जमिनीवर आपटले व नंतर तीच्या दोन्ही हातावर सुरीने वार केले. त्यात भामाबाईचा (वय ५०) जागीच मृत्यू झाला. नंतर दत्तू याने स्वत:च्या अंगावर सुरीने वार करुन घेतले. काल दुपारीच दत्तुला उपचारासाठी नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
यासंदर्भात साहेबराव लक्ष्मण शिंदे (वय ६५, रा. महालक्ष्मी हिवरा, नेवासे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तुविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी सुरी जप्त केली. पोलीस उपअधीक्षक वाय. डी. पाटील व निरीक्षक सुरेश शिंदे यांनी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक सरवदे करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2014 रोजी प्रकाशित
पत्नीचा खुन करुन आत्महत्येचा प्रयत्न
पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वत:च्या अंगावर सुरीने वार करुन आत्महत्या करण्याचा खळबळजनक प्रकार काल, शनीवारी दुपारी नेवासे तालुक्यातील पिंप्री शहाजी गावात घडला.
First published on: 27-04-2014 at 01:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Try to suicide after wifes murder