scorecardresearch

तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनास प्रारंभ

अत्यंत आशय पूर्ण छायाचित्रे आणि कल्पकतेने घडवलेल्या शिल्पकृतीचे हे प्रदर्शन ५ फेब्रुवारी दरम्यान पाहण्यास खुले राहणार आहे.

तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनास प्रारंभ
तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शन

बीड जिल्हयाच्या परळी तालुक्यातील भूमिपुत्र साळुंकवाडी आणि दौंडवाडी येथील छायाचित्रकार तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे आयोजन वरळीच्या (मुंबई) नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे करण्यात आले आहे. उदघाटन ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता  ज्येष्ठ छायाचित्रकार पदमश्री सुधारक ओलवे, सर जे. जे. स्कूल आर्टमधील प्रोफेसर गणेश तरतरे, सॅफरॉन आर्ट गॅलरीच्या अलका सामंत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

अत्यंत आशय पूर्ण छायाचित्रे आणि कल्पकतेने घडवलेल्या शिल्पकृतीचे हे प्रदर्शन ५ फेब्रुवारी दरम्यान पाहण्यास खुले राहणार आहे. तुका कर्वे यांनी कलाविषयक शिक्षण शासकीय कला महाविद्यालय औरंगाबाद येथे घेतलेले आहे. त्यांच्या छायाचित्रातील ग्रामीण संस्कृती आणि जीवनशैलीने परिपूर्ण अशी आशयपूर्ण छायाचित्रे आहेत. हरिराम फड हे दौंडवाडीचे असून त्यांचे कलाविषयक शिक्षणजी. डी. आर्ट शिल्पकला,सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे झाले आहे. त्यांच्या शिल्पकलेतील  कलेतील विषयात  गणपती, कटुंब आणि इतर असा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 04:42 IST