रवींद्र केसकर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेले सोन्या-चांदीची दागिने वितळविण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे. जानेवारी २००९ ते जून २०२३ या कालावधीतील २०४ किलो ५०८ ग्रॅम सोने आणि तीन हजार ८६१ किलो चांदीच्या दागिन्यांचा यात समावेश आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थान आणि प्रभादेवी मुंबई येथील सिध्दीविनायक गणपती न्यासाकडून जशी प्रक्रिया अवलंबली जाते, त्याच पारदर्शी पध्दतीने तुळजाभवानी मंदिर समितीनेही सोन्या-चांदीने दागिने वितळवावेत, असे शासन आदेशात म्हटले आहे.

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

हेही वाचा >>> लोकसभा निवडणूक लढवणार का? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

भाविकांनी तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू आणि तुळजाभवानी देवीच्या अंगावरील पुरातन दागदागिने, असे दोन स्वतंत्र खजिने मंदिरात आहेत. त्यापैकी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू वितळवून एकत्र करून बँकेत ठेवण्याबाबतचा ठराव तुळजाभवानी मंदिर समितीने जुलै २०२३ आणि ऑगस्ट २०२३ रोजी घेतला होता. त्यानुसार मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी शासनाने रितसर परवानगी मागीतली होती. शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या साईबाबा संस्थान आणि सिध्दीविनायक गणपती मंदिर यांच्याप्रमाणे विहित प्रक्रिया राबवून सोन्या-चांदीची दागिने वितळविण्यास काही अटी आणि शर्ती घालून शासन मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> “बावनकुळेंचे १० खासदार आले, तरी पराभव करू शकत नाहीत”, कडूंच्या आव्हानावर भाजपा नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…

तुळजाभवानी देवीच्या दैनंदिन व यात्रा काळात वापराचे दागिने, असामान्य कलाकुसरीचे पुरातन व दुर्मिळ दागिने वगळून मंदिर समितीच्या बैठकीतील ठरावानुसार केवळ भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू वितळविण्यास मान्यता देण्यात आली आहे. जतन करून ठेवावयाचे दागिने वगळता किमान १० किलो एवढ्या वजनाचे दागिने साठल्यानंतरच वितळविण्यासाठीची कार्यवाही हाती घेण्यात यावी, असेही या आदेशात नमुद केले आहे. तत्पूर्वी तीन सदस्यांनी त्याची पाहणी करावी, वजन करण्यापूर्वी वस्तूंवरील खडे काळजीपूर्वक काढून घेण्यात यावेत आणि मोहोरबंद पिशवीत ते दागिने ठेवण्यात यावेत. दागदागिन्यांची वाहतूक करण्यापूर्वी त्याचा वाहतूक विमा काढण्यात यावा, पोलीस संरक्षणाची व्यवस्था करावी, वितळविल्यानंतर आलेल्या अशुध्द तुटीतील दोन तुकडे ताब्यात घेण्यात यावेत आणि इंडिया गव्हर्नमेंट मिट यांच्याकडून त्याची तपासणी करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

जगदंबेचा खजिना लुटणारांवर लवकरच कारवाई : ओम्बासे

तुळजाभवानी देवीच्या दरबारात सोन्या-चांदीचा काळा बाजार करणारांविरोधात आता कारवाईचा फास आवळला जाणार आहे. देवीच्या पादुका, माणिकामोती, सोन्याची दागदागिने, राजे-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली देवीची ७१ मौल्यवान नाणी, अशा गायब असलेल्या दागदागिन्यांचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. ओम्बासे यांनी सोन्या-चांदीची दागिने मोजण्यासाठी समिती गठीत केली होती. मागील दोन महिन्यांच्या कालावधीत भाविकांनी अर्पण केलेले दागिने, मंदिरातील पुरातन मौल्यवान दागिने आणि महंतांच्या ताब्यात असलेली जगदंबेचे दुर्मिळ अलंकार याचे मोजमाप पूर्ण झाले आहे. तो अहवाल प्राप्त झाला असून लवकरच कायदेशीर तज्ञांकडून त्याची तपासणी करून दोषींविरोधात कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.