रवींद्र केसकर

धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या सर्व मौल्यवान दागिन्यांची मोजणी प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाह गहाळ असलेल्या प्राचीन मौल्यवान अलंकारचा अहवाल मात्र अद्याप सादर करण्यात आलेला नाही. सोमवारी झालेल्या मोजणी प्रक्रियेतून पुजारी मंडळाचे पदाधिकारी व महंतांनी अंग काढून घेतले त्यामुळे एकतर्फी मोजणी उरकण्याची वेळ महसूल प्रशासनावर आली.

तुळजाभवानी मंदिरातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, वेगवेगळ्या राजा-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली ७१ मौल्यवान दुर्मिळ नाणी अद्यापही गायब आहेत. या प्रकरणी तीन अधिकार्‍यांसह पाच जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. मंदिर समितीच्या अध्यक्षांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने पाच जणांना याप्रकरणी दोषी धरले होते. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. सदरील गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेले महत्वपूर्ण कागदपत्र दागिन्यांची मोजणी करण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी मंदिर समितीकडे सुपूर्द केले. त्यामुळे रखडलेली सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी सोमवारी मार्गी लागली.

आणखी वाचा-अँटिलिया स्फोटके-मनसुख हिरेन हत्या प्रकरण; माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक व्यवस्थापक पदाचा पदभार १८ जुलै रोजी हस्तांतरीत करण्यात आला. त्यावेळी तुळजाभवानीचे अनेक प्राचीन व मौल्यवान दाग-दागिने गहाळ असल्याचे उघडकीस आले. तत्पूर्वी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात २००१ ते २००५ या कालावधीत सोन्या-चांदीच्या मौल्यवान दाग-दागिन्यांना पाय फुटले असल्याचे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी निदर्शनास आणून दिले होते. तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक राजाभाऊ दिक्षीत यांच्या निधनानंतर कोणतीही कायदेशाीर प्रक्रिया पार न पाडता, त्यांच्या घरून चाव्या आणण्यात आल्या आणि देवीचा जमादारखाना तत्कालीन अधिकार्‍यांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी पहिली तक्रार गंगणे यांनी केली होती.

विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेले सोने-चांदी वितळविण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी एकवेळा सोने वितळविल्यानंतर तब्बल ५५ किलोची तूट कागदोपत्री नोंद करण्यात आली आहे. मागील १३ वर्षांत २०४ किलो सोने आणि ८६१ किलो चांदी भाविकांनी अर्पण केली आहे. तुळजाभवानी देवीचे सोने-चांदी व इतर मौल्यवान दाग-दागिने वितळविण्याची प्रक्रिया गहाळ झालेल्या दागिन्यांच्या छडा लागेपर्यंत स्थगीत करावेत. त्याचबरोबर त्रिसदस्यीय समितीने दोषी ठरविलेल्या अधिकारी व महंतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन किशोर गंगणे यांनी विधीज्ञ शिरीष कुलकर्णी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांना दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तानाजी सावंत आणि आमदार तथा मंदिर समितीचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.

आणखी वाचा-राज्यावर टंचाईचे संकट, धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७१ दुर्मिळ ऐतिहासिक ७१ नाणी अद्याप गायब

बिकानेर (४), औरंगजेब (१), डॉलर (६), चित्रकूट उदयपूर संस्थान (३), ज्यूलस (१), शहाआलम इझरा (४), बिबाशूरूक (१), फुलदार (१), दारूल खलीफा (१), फत्तेहैद्राबाद औरंगजेब अलमगीर (१), दोन आणे (२), इंदौर स्टेट सूर्या छाप (१), अकोंट (२), फारोकाबाद (१), लखनऊ (१), पोर्तुगीज (९), इस्माईल शहा (१), बडोदा (२), रसुलइल्ला अकबर व शहाजहान (४), ज्यूलस हैद्राबाद (५), अनद नाणे (२०).